महत्वाच्या बातम्या
-
भाजपामध्ये भूकंप? | १४ झेडपी सदस्य, ३५ पंचायत समिती सदस्य, ४० नगरसेवक, १६ बाजार समिती सदस्य, ११ मंडळ अध्यक्षांचे राजीनामे
बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात डावलण्यात आल्याने बीड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून भाजपच्या पंचायत समिती सदस्यांपासून नगरसेवकांपर्यंत पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र सुरू केले आहे. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सोमवारपर्यंत १५० राजीनामे आले असून ते मुंबईला गेले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडे यांच्याविरोधात पक्षांतर्गत राजकारण तापवलं जातंय? | बैठकीत धाडसी निर्णयाची शक्यता
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या समर्थकांना पंकजा मुंडे मंगळवारी भेटणार आहेत. मुंबईतील वरळी येथील कार्यालयात पंकजा मुंडे समर्थकांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारीच त्या दिल्लीहून मुंबईला परतणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दिल्ली वारीनंतर समर्थकांची समजूत काढताना पंकजा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींनी सुद्धा पंकजांना राष्ट्रीय मुद्यांच्या बहाण्याने सुनावले | वेगळा निर्णय घेण्याची शक्यता बळावली
बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने बीड मध्ये भाजपच्या विरोधात मोठा आक्रोश उमटत असताना दिसत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात गोपिनाथ मुंडे यांची कन्या खासदार प्रीतम मुंडे यांचा विसर मोदी सरकारला पडल्याचे पहायला मिळाल्याने अनेकांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हा अध्यक्षांकडे सोपविले असून, जिल्हाध्यक्ष देखील पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा असताना ऐनवेळी त्यांचा पत्ता कापण्यात आला. याचमुळे आता मुंडे समर्थक आक्रमक झाले असून, उद्या शेकडो कार्यकर्ते पंकजा भेटून वेगळा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिका निवडणुक स्वबळावरच, मनसेबरोबर युती नाही - आ. आशिष शेलार
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील काही घटक पक्षांनी येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय जनता पक्षानेही स्वबळावर निवडणुका लढवण्याचे संकेत दिले आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार अॅड. आशिष शेलार यांनीही मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचं सुतोवाच केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेने बरोबर युती करणार नाही, असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना-भाजप युती होणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
सहकारी पक्ष भडकले | पटोले स्पष्टीकरण देताना म्हणाले, ते वक्तव्य केंद्राबाबत होतं, राज्याबाबत नव्हे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं आज उत्तर दिलं आहे. ‘पटोले यांनी योग्य माहिती अभावी हे वक्तव्य केलं आहे. त्यांनी आधी व्यवस्थेची माहिती करून घ्यावी,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हाणला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सध्या 12 आमदारांच्या यादीवर मी तोंडावर मास्क ठेवलेलं बरं आहे - उर्मिला मातोंडकर
पावसाळी अधिवेशन संपले तरीही राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीचा प्रश्न काही सुटला नाही. शिवसेनेकडून अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांना आमदारकी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे नाव राज्यपालांकडे पाठवले आहे. ’12 आमदारांच्या यादीवर मी तोंडावर मास्क ठेवलेलाच बरं आहे, पण आमदारकी मिळाली तर आनंदच आहे’, असं म्हणत ऊर्मिला यांनी आपली इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारला लक्ष करताना 'कसाई' ऐवजी 'खाटीक' असा शब्द वापरला | टीका होताच भातखळकरांचा माफीनामा
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या शहरातून गाय चोरीच्या घटना समोर आली होती. बकरी ईद अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच या गाय चोरीच्या घटना घडताना समोर आल्याने राजकारणही करण्यात आलं. त्यामुळे विरोधकांनी भिवंडीतील कत्तलखाने पुन्हा सक्रिय झाल्येत का? असा सवाल उपस्थित केला होता.
4 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाच्या लोकांची माथी भडकवणे इतकाच नेत्यांचा उद्देश आहे का? - राज ठाकरे
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जर सर्वांनाच मान्य आहे तर अडलं कुठं?, असा सवाल करतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांची माथे भडकावून केवळ राजकारण करायचे आहे का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पक्षीय नेत्यांना केला.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोलवरील कर आकारणी | मोदींच्या बचावासाठी फडणवीसांकडून आकड्यांच्या टोप्या? | अशी केली पोलखोल
खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. मात्र दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत धडधडीत खोटे बोलणे कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही. असा जोरदार हल्ला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करामधील १२ रुपये राज्यांना मिळतात त्यामुळे राज्य सरकारने आधी स्वत:कडे बघण्याची आवश्यकता आहे,’ असे फडणवीस काल पुण्यातील पुण्यात म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई हायकोर्टाची टीप्पणी, पोलीस प्रशासन प्रमुखही तितकाच जबाबदार | परमबीर सिंग स्वतःच अडकणार?
मुंबईचे पोलीस माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बुधवारी मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीनंतर परमबीर सिंग यांच्यावरही CBI चौकशीची टांगती तलवार असणार आहे. तसेच राज्य सरकारच्या तपास यंत्रणा देखील त्यांना अटक करू शकण्याच्या शंकेने केंद्रीय तपास यंत्रणा देखील आधीच कार्यरत झाल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकारमधील फोन टॅपिंग प्रकरण | त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन
फोन टॅपिंग करणे हा गंभीर प्रकार असून अशा प्रकरणात रितसर परवानगी घेणे गरजेचे आहे. परंतु तशी प्रक्रिया या प्रकरणात पार पाडल्याचे दिसत नाही. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याची माहिती घेऊ, असे आश्वासन वळसे पाटील यांनी सभागृहाला दिले होते.
4 वर्षांपूर्वी -
प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी | हेल्थ बुलेटीन द्वारे माहिती
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली आहे. त्यामुळेच ते तीन महिने विश्रांती घेणार असून या दरम्यान कोणत्याही राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
टीम देवेंद्र वगैरे माहिती नाही | पण कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे - पंकजा मुंडे
टीम देवेंद्र वगैरे असं आमच्याकडे नाही, मी मी असं चालत नाही, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. नवीन चेहरे आले, त्यामुळे पक्षाची ताकद वाढणार, असं पक्षाच्या श्रेष्ठींना वाटत असेल, तर माझा त्यावर विश्वास आहे. पक्षाची ताकद वाढली, तर हा निर्णय योग्य ठरेल, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत शुक्रवारी लसीकरण बंद | शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसींचा तुटवडा
लसीकरण मोहीम सुरू असून सतत लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण बंद ठेवावे लागत आहेत. तसेच कमी लसीकरण केंद्रांवर लस द्यावी लागत आहे. गुरूवारीही लसीचा तुटवडा असल्याने काही केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. आज (शुक्रवार) लसीचा तुटवडा असल्याने पालिका आणि सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद राहील अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवारांचा जबाब नोंदवला जाणार
भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने झाला आणि निरपराध व्यक्तींना त्यात गुंतवण्यात आले, असा आरोप शरद पवार यांनी यापूर्वी केला होता. भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ला देण्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भीमा कोरेगाव प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती.
4 वर्षांपूर्वी -
घरबसल्या वय, राष्ट्रीयत्व आणि डोमासाईल प्रमाणपत्र ऑनलाईन कसं काढायचं? - असा करा अर्ज
महाराष्ट्रात किंवा देशातील कोणत्याही राज्यामध्ये शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल. सरकारी नोकरीसाठी किंवा सैन्यातील नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर महत्वाचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं आवश्यक असते ते म्हणजे वय,राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र होय. या प्रमाणपत्राला डोमासईल प्रमाणपत्र म्हणून देखील ओळखलं जाते. हे प्रमाणपत्र महाविद्यालीन विद्यार्थी, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आवश्यक असते.
4 वर्षांपूर्वी -
चिंता मिटली | परीक्षा न देता उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला 11वीत प्रवेश मिळेल
कोरोना लाटेमुळे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्यामुळे यंदा अकरावीच्या वर्गात जागा कमी पडतील, ही भीती चुकीची ठरणार आहे. कारण राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध विद्यार्थ्यांपेक्षा ३५ टक्के जागा अधिक आहेत. यामुळे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले तरी प्रत्येकाला अकरावीत हमखास प्रवेश मिळेल. पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी मात्र सीईटीचे मार्क महत्त्वाचे ठरतील. यंदा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे अकरावीत प्रवेश मिळेल की नाही, याची चिंता पालकांना सतावते आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिवंगत गोपीनाथ मुंडेंचे निकटवर्तीय कराडांना मंत्रिपद हा पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव - शिवसेना
केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्याने भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंडे भगिनींना डावलल्याचा सूर समर्थकांतून व्यक्त होत आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय राहिलेले डॉ. कराड यांना पहिल्यांदाच राज्यसभा आणि वर्षभरातच थेट मंत्रीपद मिळाल्याने मुंडे भगिनी समर्थकांना नेमके काय व्यक्त व्हावे असा प्रश्न पडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य भाजपवर आयात नेत्यांचं वर्चस्व | शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस ते मनसे नेत्यांना लॉटरी
देशात असो किंवा राज्यात, भारतीय जनता पक्षाचं राजकारण २०१४ नंतर पूर्णपणे बदललं असून त्यात मूळ भाजप पदाधिकारी आणि नेते मंडळींच्या राजकारणाला अहोटी लागल्यात जमा आहे. त्यात फडणवीसांनी देखील देशातील मोदी नीतीप्रमाणे राज्यातही फडणवीस नीती सुरु करून केवळ निवडून येण्याच्या निकषावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी ते मनसेतील नेते मंडळींना प्राधान्य दिल्याचं वारंवार पाहायला मिळालंय. त्यातही या पक्षातील नेत्याचा पराभव झाल्यास त्यांना पुन्हा विधान परिषद किंवा राज्यसभेवर पाठवून मोदी पद बहाल करण्याचा फडणवीसांनी सपाटाच लावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ईडीची ही कारवाई राजकीय हेतूने | मला आणि माझ्या कुटुंबियांना छळण्याचा प्रयत्न - एकनाथ खडसे
भाजपातून बाहेर पडल्यानंतर आपल्यामागे ईडीची चौकशी लागणार हे जवळपास एकनाथराव खडसेंना माहितीच होते. गुरुवारी खडसेंना चौकशीकामी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहायचे होते तत्पूर्वी ते १० वाजता पत्रकार परिषद घेऊन संवाद साधणार होते. एकनाथराव खडसे पत्रकार परिषदेत काहीतरी बॉम्बगोळा टाकणार असल्याची चर्चा होती परंतु त्या अगोदरच प्रकृती अस्वस्थतेमुळे पत्रकार परिषद रद्द झाल्याचे कळविण्यात आले. नेमक्या रात्रभरात काय घडामोडी घडल्या की खडसेंनी पत्रकार परिषद रद्द केली मात्र ईडीच्या चौकशीला ते सामोरे जाणार आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा, 5219 टक्के परतावा देणारा शेअर मालामाल करणार - NSE: TATACONSUM