महत्वाच्या बातम्या
-
डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे येत्या २ महिन्यात तिसऱ्या लाटेचा धोका | मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना सतर्कतेचे निर्देश
महाराष्ट्र सरकारने ठरवलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन न झाल्यास येत्या एक-दोन महिन्यात राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार. ही शंका राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कोरोना टास्क फोर्सने व्यक्त केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आढावा घेण्यासाठी बुधवारी बैठक झाली. यात कोरोनाचा “डेल्टा प्लस” म्हणजेच AY.1 व्हेरिएंटमुळे राज्यात तिसरी लाट येण्याचा धोका मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाला धक्का | माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख भाजपाला रामराम ठोकण्याच्या तयारीत
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भारतीय जनता पक्षाला धक्के बसत आहेत. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभव, सांगली व जळगाव महापालिकेची सत्ता हातातून निसटल्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये अस्वस्थता आहे. पुन्हा सत्ता मिळण्याची चिन्हं नसल्यानं निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये आलेले अनेक नेते व आमदार अस्वस्थ आहेत. त्यातूनच आता घरवापसी सुरू झाली आहे. सुनील देशमुख यांची घरवापसी हा भारतीय जनता पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार होईल - संजय राऊत
एकाबाजूला शिवसेनेच्या मुखपत्रातून राष्ट्रवादीबरोबर युती करणार असल्याचं उघड उघड जाहीर केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी या युतीचा पुनरुच्चार केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ती बाळासाहेब ठाकरेंची वास्तू, शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचं कारण काय? म्हणून शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला
भारतीय जनता पक्षाचे काही लोक काल शिवसेना भवनासमोर आले होते. त्यांनी तिथे राडा करण्याचा प्रयत्न केला. राडा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू द्या, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सज्जड इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणप्रश्नी आज संभाजीराजे आणि मुख्यमंत्री यांच्यात वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी काल मोर्चा काढल्यानंतर खासदार संभाजी छत्रपती आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत पाच मागण्या आणि मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. मात्र, भेट सकारात्मक न झाल्यास काय होईल हे सांगायची गरज नाही, असा सूचक इशाराच संभाजी छत्रपती यांनी बैठकीपूर्वी दिला आहे. त्यामुळे आजच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
माजी एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची NIA कडून चौकशी | अटकेची शक्यता
अँटीलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन मर्डर केसमध्ये बुधवारी नॅशनल इंवेस्टिगेशन एजंसी (NIA) ने माजी ACP एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना ताब्यात घेतले आहे. शर्माच्या घरी बुधवारी सकाळी छापेमारी करत NIA ने चौकशी सुरू केली आहे. एनआयए प्रदीप शर्मा आणि निलंबित API सचिन वझे आणि माजी कॉन्स्टेबल विनायक शिंदे यांच्यातील संबंधांचा तपास करत आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या फटकार मोर्चात भाजप कार्यकर्त्यांना 'फटके' पडल्यानंतर स्थानिक शिवसेना आमदारांची प्रतिक्रिया
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे तेजिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली या फटकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राम मंदिर भूखंड घोटाळ्यावरून शिवसेनेने केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून युवा मोर्चाने आंदोलन पुकारले होते. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचा मोर्चा शिवसेना भवनावर येणार असल्याची कुणकुण लागताच शिवसेनेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक शिवसेना भवना समोर जमले, विशेष म्हणजे त्यात महिलांचा मोठा प्रमाणावर समावेश होता. यावेळी अनेक भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याचा जाहीर आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शासकीय यादी मान्य करण्याचे राज्यपालांना बंधनकारक नाही | सरकार व राज्यपालांच्या सचिवांना स्पष्टीकरणाचे निर्देश
राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांची यादी राज्यपालांकडे असल्याची बाब पुढे आली. राज्यात यावरुन धुमशान सुरु असतानाच शासकीय यादी मान्य करण्याची मुदत राज्यपालांना नसल्याचे मत न्यायालयात नोंदविण्यात आले आहे. तसेच न्यायालयाला स्पष्टीकरण देण्याचे अधिकार राज्यपालांना नसून राज्य सरकारकडे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारची आता चांगलीच कोंडी झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आम्ही बाळासाहेबांच्या रणरागिणी आहोत, हिंमत असेल तर समोर यायचं, फाडून काढणार एकेकाला
उत्तर प्रदेशाच्या अयोध्येतील राम मंदिर भूखंड खरेदीत झालेल्या घोटाळ्यावरून शिवसेनेने टीका केली होती. त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने आज दादरच्या शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला. मात्र, शिवसेना भवनासमोर शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमल्याने पोलिसांनी या आंदोलकांना सेना भवनापासून पाच किलोमीटर अंतरावरच अडवलं. तसेच या मोर्चकऱ्यांची धरपकड करण्यात आली. परंतु, दोन्ही पक्षांमधील संघर्ष टळला असं वाटत असतानाच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना कार्यकर्ते अचानक भिडल्याने सेना भवन परिसरात तणाव निर्माण झाला.
4 वर्षांपूर्वी -
सेना भवनवर भाजपचा मोर्चा | शिवसैनिकांकडून भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना चोप | पोलिसांकडून धरपकड
उत्तर प्रदेशाच्या अयोध्येतील राम मंदिर भूखंड खरेदीत झालेल्या घोटाळ्यावरून शिवसेनेने टीका केली होती. त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने आज दादरच्या शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला. मात्र, शिवसेना भवनासमोर शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमल्याने पोलिसांनी या आंदोलकांना सेना भवनापासून पाच किलोमीटर अंतरावरच अडवलं. तसेच या मोर्चकऱ्यांची धरपकड करण्यात आली. परंतु, दोन्ही पक्षांमधील संघर्ष टळला असं वाटत असतानाच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना कार्यकर्ते अचानक भिडल्याने सेना भवन परिसरात तणाव निर्माण झाला.
4 वर्षांपूर्वी -
स्वबळाची घोषणा करणाऱ्या मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद निवडणुकीआधीच चव्हाट्यावर
मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. कारण मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरोधात काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार केली आहे. भाई जगतापांची कार्यपद्धतीवर बोट ठेवत, आपल्याला डावललं जात असल्याचा आरोप झिशान सिद्दीकींनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा
भारतीय स्टेट बँक मुंबई भरती २०२१. एसबीआय भरती २०२१. स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून १६ अभियंता (अग्निशमन) पदांसाठी अर्ज मागविला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआय भरती 2021 साठी 28 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
12 आमदारांची यादी 7 महिन्यांपासून राज्यपालांकडेच | आता मुंबई हायकोर्टातही याचिका
महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या अपिलावर आज सुनावणी झाली. त्यावेळी ही नावांची यादी राज्यपालांकडे सुरक्षित असल्याचं त्यांना कळवण्यात आलं.
4 वर्षांपूर्वी -
केवळ नावाने 'अवजड' असणारं खातं मिळण्याची शक्यता | विस्ताराच्या नावाने राज्यात राजकारणाच्या उद्योगासाठी वापर?
मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होईल असं सांगितलं जातं आहे आणि त्यातच महाराष्ट्रातून एखाद दोन खासदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागेल अशी चर्चा आहे. अजूनही अधिकृतपणे यावर कुणी काही बोलायला तयार नाही. पण ज्या दोन नेत्यांचं नाव चर्चेत आहे, त्यातले एक आहेत नारायण राणे आणि दुसऱ्या आहे बीडच्या खासदार प्रीतम मुंडे.
4 वर्षांपूर्वी -
गावाकडली खुशखबर | महामंडळाकडून बियाणे परमिट वाटप सुरु | जाणून घ्या कसं मिळवाल
बियाणे परमिट वाटप सुरु झालेले आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेवूयात. बियाणे अनुदान योजनेचा ऑनलाईन अर्ज भरला होता त्यांना कृषी विभागाकडून बियाणे परमिट वाटप करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झालेले आहे. बियाणे खरेदी करण्याचा परमिट कसे असते, कोणकोणत्या बियाण्यांसाठी हे परमिट वाटप सुरु झालेले आहे, कोणत्या बियाण्यासाठी शेतकऱ्याला किती रक्कम भरावी लागणार आहे. हे परमिट किती दिवस चालते, तुम्हालाही असे परमिट मिळाले असेल तर पुढील प्रक्रिया काय करावी याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
आषाढी वारी | वाखरीपासून दीड किमी पायी वारीला परवानगी, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणि कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी वारीसाठी मानाच्या 10 पालख्यांना एसटी बसमधून पंढरपूरला जाण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आषाढी वारी 2021 च्या नियोजनाला आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिला आहे. त्याबाबतचा आदेश आज राज्य सरकारनं काढलाय. तर वाखरीपासून दीड किलोमीटर अंतर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चालत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी अन ग्रामीण बेरोजगारांसाठी | शेळी पालन शासकीय कर्ज योजना २०२१ - वाचा आणि लाभ घ्या
मित्रांनो शेळी पालन कर्ज योजना संदर्भात माहिती जाणून घेवूयात. शासनाच्या वतीने शेळी/मेंढी गट वाटप राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय योजना अंतर्गत लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो. तुम्ही जर शेळीपालन व्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्हाला शेळी पालन कर्ज योजना साठी अनुदान मिळणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
खुशखबर | ड्रायव्हिंग लर्निंग लायसन्स आता घरबसल्या मिळवा | योजनेबद्दलची माहिती वाचा
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने Learner’s License साठीच्या प्रक्रियेतही काही बदल केले आहेत. यामध्ये आता ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही. ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे मोठं कठीण काम कारण यासाठी गाडी चालवून परीक्षा दिली जाते. आता फारसं सोपंही झालं असलं तरी आधी यासाठी खूप धावाधाव करायला लागायची. कार्यालयं फिरा, दलालांना शोधा. पण आता सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देत ही प्रक्रिया ऑनलाईन केल्यामुळे जनतेचा त्रास कमी झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेचं ५ वर्ष मुख्यमंत्री असतील | नाना पटोलेंचं स्पष्टीकरण
महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदावरून पडद्याआड सुरू असलेली चर्चा आता समोर येत आहे. उद्धव ठाकरे हेच पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील जर राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाची भूमिका घेतली तर काँग्रेस योग्य भूमिका घेईल, असं महत्त्वाची विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच पाच वर्ष राहणार असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेच्या भूमिकेचं समर्थनं केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोविड काळात गर्दी होईल म्हणून ते थांबले होते | पण राज ठाकरेंचे झंझावाती दौरे सुरु होतील - बाळ नांदगावकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते मुंबईतील लसीकरण उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाळा नांदगावकर यांनी मनसे आणि राज ठाकरे यांची पुढील रणनीती सांगितली. आगामी महापालिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रचंड तयारी झाली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा, 5219 टक्के परतावा देणारा शेअर मालामाल करणार - NSE: TATACONSUM