महत्वाच्या बातम्या
-
UPSC ची परीक्षा रद्द | आता महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत - काँग्रेस
मागील 24 तासात तीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात 2 लाख 63 हजार 533 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आदल्या दिवसाच्या तुलनेत 18 हजारांनी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र कोरोनाबळींचा आकडा वाढला असून तब्बल 4 हजार 329 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
4 वर्षांपूर्वी -
Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये
तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात बसल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील हिंदमाता आणि अन्य सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. तर अनेक भागात झाडे उन्मळून पडली आहेत. अशावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये पोहोचले. तिथून त्यांनी मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतलाय. त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्वाच्या सूचनाही केल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा
तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला असून अनेक ठिकाणी झाडं कोसळून मोठं नुकसान झालं आहे. राजापूर, रत्नागिरीच्या किनारपट्टीभागात सोसाट्याचा वारा सुरू असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तौत्क चक्रीवादळ कोकण किनारपट्टीसह मुंबई जवळून प्रवास करणार आहे. त्यामुळे किनारपट्टीभागात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट'
कोणत्याही विषयात ट्विट करून कायम प्रकाशझोतात राहण्याचा अमृता फडणवीस यांचा प्रयत्न काही नवा विषय राहिलेला नाही. त्यांना देखील कोणत्याही विषयात सत्ता बदलाची स्वप्न कायम पडत असतात. अनेकदा त्यांच्या ट्विटचा अर्थ त्यांना स्वतःला तरी समजतो का असा देखील प्रश्न उपस्थित होताना दिसला आहे.
4 वर्षांपूर्वी -
तौते चक्रीवादळ | मुंबईकरांनो वादळ-वारे मुंबईच्या उंबरठ्यावर | पुण्यासह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडणार
अरबी समुद्रात निर्माण झालेले आणि गेल्या दोन दिवसांपासून गुजरातच्या दिशेनं सरकत असलेले तौते चक्रीवादळ मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. हवामान विभागाच्या ताज्या माहितीप्रमाणे तौते चक्रीवादळ मुंबईपासून १७० किमी अंतरावर आहे. हे वादळ हळूहळू पुढे सरकत असून, याचा प्रभाव मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, जळगाव यासह इतरही काही जिल्ह्यात दिसून आला आहे. रविवारी सायंकाळपासून मुंबईत पावसाला सुरूवात झाली. तर पुणे, सातारा आणि जळगाव जिल्ह्यात वादळाचा तडाखा बसला.
4 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाच्या आंदोलनात भाजपचा सक्रिय पाठिंबा | पक्षीय स्वरूपाने समाजात उभी फूट पडण्याची भीती - सविस्तर वृत्त
मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे यासाठी समाजातर्फे होणाऱ्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण पाठिंबा असेल व पक्षाचे नेते, कार्यकर्ते त्यामध्ये संपूर्ण ताकदीने सहभागी होतील, अशी घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मुंबई येथे केली. मराठा आरक्षणासाठी आपल्या अध्यक्षतेखाली पक्षाची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी....
कोरोनाच्या संपूर्ण संकटकाळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्याइतकं काम राज्यातील इतर कोणत्याच नेत्याने केलं नाही, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. आम्ही कोरोनाच्या काळात सतत फिरत आहोत. आमच्या दोघांइतकं कोणताच नेता फिरला नसेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. प्रत्येक गोष्टीत राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. राज्यांनी ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवणं थांबवलं पाहिजे. सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
4 वर्षांपूर्वी -
ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
देशात कोरोनामुळे मृत्यूंचा आकडा २.६२ लाखांच्या वर पोहोचला आहे. दुसरीकडे, सध्या उत्तर प्रदेशातील कानपूर, कन्नौज, उन्नाव, गाझीपूर आणि बलियामधील परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि इथलं भीषण वास्तव देखील समोर आलं आहे. वास्तवात समोर येणारं चित्र हे अत्यंत भीषण असून योगी सरकार हतबल असल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली
देशातील १५ राज्यांत एक दिवसात बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त नोंदली गेली. या राज्यांत महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, बिहार, तेलंगण, पंजाब, आसाम, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल, गोवा आणि चंदीगड यांचा समावेश आहे. देशात शुक्रवारी ३,३३,६०९ नवे रुग्ण आढळले. गुरुवारी ही संख्या ९,५३५ ने जास्त होती. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या त्यापेक्षा जास्त म्हणजे ३,६३,२९४ राहिली.
4 वर्षांपूर्वी -
Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे
देशातील १५ राज्यांत एक दिवसात बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त नोंदली गेली. या राज्यांत महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, बिहार, तेलंगण, पंजाब, आसाम, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल, गोवा आणि चंदीगड यांचा समावेश आहे. देशात शुक्रवारी ३,३३,६०९ नवे रुग्ण आढळले. गुरुवारी ही संख्या ९,५३५ ने जास्त होती. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या त्यापेक्षा जास्त म्हणजे ३,६३,२९४ राहिली.
4 वर्षांपूर्वी -
BMC Updates | मुंबईत पुढील २ दिवस कोरोना लसीकरण केंद्र बंद | ट्विट करून माहिती
महाराष्ट्रात एकाबाजूला कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे राज्यात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस मुंबईतील सर्व कोरोना लसीकरण केंद्र बंद ठेवली जाणार आहे. मुंबई महापालिकेने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग यांना 20 मे पर्यंत अटक करणार नाही | राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात हमी
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे खळबळजनक आरोप केल्यानंतर चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गुरुवारी कारवाईपासून तात्पुरता दिलासा मिळाला. महाराष्ट्र सरकारने आम्ही 20 मेपर्यंत परमबीर सिंग यांना अटक करणार नाही, अशी हमी मुंबई हायकोर्टात दिली. सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
सोशल मिडीयासाठी खर्च आणि यंत्रणा नको | सोशल मीडियासाठी 6 कोटी खर्च करण्याचा निर्णय रद्द
उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश “उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (१३ मे) दिले आहेत. उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाउनला 1 जून पर्यंतची वाढ | राज्य सरकारकडून निर्बंधांची नवीन नियमावली जारी
राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनला 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, सध्या राज्यात जे निर्बंध घालून देण्यात आले आहेत, ते कायम राहतील. या निर्णयाचे परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आले असून, आता ब्रेक द चेनचे निर्बंध 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असतील.
4 वर्षांपूर्वी -
उपमुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर ६ कोटी खर्चाची योजना | तर मोदी सरकारचा २०२० मध्ये ७१३ कोटीचा मार्केटिंग विक्रम
राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियावर तब्बल ६ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने काल यासंदर्भातील आदेश जारी केले आहे. या आदेशात अजित पवार यांची सोशल मीडियावरील खाती सांभाळण्यासाठी आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एखादी बाहेरची कंपनी नियुक्त करण्यात येणार आहे. ही कंपनी अजित पवार यांचे ट्विटर, फेसबुक, ब्लॉगर, यूट्युब आणि इन्स्टाग्राम खात्याचे काम बघेल.
4 वर्षांपूर्वी -
घरपोच दारुवर सकारात्मक निर्णयास उत्सुक तत्कालीन फडणवीस सरकारमधील नेते पवारांच्या त्या पत्रावर का नाराज? - सविस्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील काही प्रतिनिधींनी त्यांच्या समस्या मांडल्या होत्या, या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलं असल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. दरम्यान शरद पवारांनी पाठवलेल्या या पत्रानंतर भाजपकडून टीका केली जात आहे. दरम्यान भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी शरद पवारांना यासंबंधी एक पत्र लिहिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी अन्वय नाईक प्रकरणी कारवाई केली आणि मोहन डेलकर आत्महत्येनंतर SIT नेमली म्हणून....
मला प्रसार माध्यमांच्या माध्यमातुन अशी माहिती मिळत आहे की, ईडीकडुन आता माझी चौकशी होणार आहे. मी न केलेल्या गुन्हयाची शिक्षा देण्याचे काम राजकीय हेतुपोटी सुरु आहे. मी गृहमंत्री असतांना मधल्या काळात काही महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे केंद्र सरकार नाराज असून शकते आणि त्यामुळे माझी चौकशी सिबीआय व ईडीच्या माध्यमातुन होत आहे. पण एक आहे “सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजीत नही” असे मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला, राष्ट्रपतींना पत्र, तर पंतप्रधानांची देखील भेट घेणार
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्यानंतर राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळालं. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राष्ट्रपती महोदयांना लिहिलेलं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
4 वर्षांपूर्वी -
Maratha Reservation | केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षण द्या, मुख्यमंत्र्यांचं नरेंद्र मोदींना पत्र
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा रोष मराठा समाजाने ठाकरे सरकारवर काढला. त्यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून नव्या प्रयत्न केले जात आहे. याच मुद्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (११ मे) सायंकाळी ५ वाजता राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. मध्यतंरी झालेल्या वादानंतर ही पहिल्यांदाच ही भेट होणार आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC