महत्वाच्या बातम्या
-
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबाबतही कोत्या मनाचे राजकारण केले - नारायण राणे
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊन लागला तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू | नाट्यगृहांबाबत कलाकारांची मुख्यमंत्र्यांना विनंती
कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा स्फोट महाराष्ट्रात झाला आहे. गेल्या 24 तासांत 43,183 नवीन रुग्ण समोर आले आहेत. कोणत्याही राज्यात कोरोनाची सापडलेली ही सर्वात जास्त प्रकरणे आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिका, फ्रान्स आणि ब्राझील देशांमध्येच फक्त महाराष्ट्रापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. सर्वात जास्त रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्रात जगात चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर आपत्कालीन बैठक बोलावली आहे. सध्या मुंबईत कडक नियम लागू करण्याचा देखील सरकार विचार करत आहे.
4 वर्षांपूर्वी -
जनतेच्या सुरक्षेची काळजी घेणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम | मास्कवरून महापौरांचा टोला
कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा स्फोट महाराष्ट्रात झाला आहे. गेल्या 24 तासांत 43,183 नवीन रुग्ण समोर आले आहेत. कोणत्याही राज्यात कोरोनाची सापडलेली ही सर्वात जास्त प्रकरणे आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिका, फ्रान्स आणि ब्राझील देशांमध्येच फक्त महाराष्ट्रापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. सर्वात जास्त रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्रात जगात चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर आपत्कालीन बैठक बोलावली आहे. सध्या मुंबईत कडक नियम लागू करण्याचा देखील सरकार विचार करत आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई लोकल ट्रेन | राज्य सरकारकडून महत्वाची माहिती
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा काँग्रेस पक्षाचे प्रमुख या तिघांनी लॉकडाउनसंदर्भात विचार केलेला नाही. या सगळ्या परिस्थितीत अधिक कडक निर्बंध कसे लावता येतील यावर चर्चा होणार आहे. कालच यावर नव्याने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आमच्या विभागाकडून फाईल गेली आहे. अंतिम निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल,” अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ‘वर्षा’वर बोलावली महत्वाची बैठक
राज्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. पुन्हा लॉकडाऊन लावण्यासारखी परिस्थिती सध्या उद्भवली आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी 4.30 वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, देशातीलही एकूणच कोरोची स्थिती गंभीर होत असल्याने आज दिल्लीतही महत्वाची बैठक होणार आहे. तसेच, पुण्यातही आज पुण्याचे पालकमंत्री अजित पवार बैठक घेणार आहेत. पुण्यात लॉकाडऊन लागणार की निर्बंध क़डक होणार यासाठी आजची बैठक आहे. त्यामुळे एकूणच कोोरनाची स्थिती पाहता आजच्या सगळ्या बैठका महत्वाच्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सचिन वाझेंच्या गाडीतील ती नोटा मोजण्याची मशीन त्यांची नव्हे | संबंधित महिलेला अटक
अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटकेत असलेले निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यासोबत दिसलेल्या ‘महिलेचं’ रहस्य उलगडण्याची शक्यता आहे. मीरा रोडच्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्समध्ये एनआयएचे (NIA) पथक गुरुवारी रात्रीपासून जवळपास 13 तास तपास करत होते. त्यानंतर एका बुरखाधारी महिलेसह एनआयएची टीम मुंबईला रवाना झाली. मनसुख हिरेन हत्या प्रकरणी काही धागेदोरे सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
HSC Board Exams 2021 | 3 एप्रिलपासून 12'वी च्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट ऑनलाईन उपलब्ध
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 12 वी च्या विद्यार्थ्यांना 3 एप्रिलपासून परीक्षेचे हॉलतिकीट ऑनलाईन उपलब्ध येणार आहे. सर्व कनिष्ठ महाविद्यालयं महाराष्ट्र राज्य बोर्डच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावरुन हॉलतिकीट डाऊनलोड करु शकतील. यासाठी त्यांना शाळा/महाविद्यालयांचा लॉगईन आयडी (Login ID) वापरावा लागेल.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात एकाच दिवसात तब्बल ३ लाखांहून अधिक नागरिकांना लस
महाराष्ट्रात कोराेनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर जात आहे. राज्यात २८ मार्चला ४०,४१४ रुग्ण आढळले होते. यानंतर ३१ मार्चला ३९,५४४ रुग्ण वाढले. गुरुवारी हा आकडा वाढून पुन्हा ४३,१८३ झाला. महाराष्ट्रात मार्च महिन्यात ६.५१ लाख नवीन कोरोना रुग्ण वाढले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
तत्कालीन मुख्यमंत्र्यांना न सांगताच ‘अवगत’ केल्याचा शेरा मारून फाईल सरकवायचे पराक्रमी मंत्री - सविस्तर
सध्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्र्यांवर पदाच्या गैरवापर केल्याचा आरोप भाजपकडून करणं सुरु आहे. मात्र भाजपमधील म्हणजे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचे पराक्रम देखील मोठे आहेत ज्याचा अनेकांना विसर पडला असावा. तत्कालीन फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना नेमकं का हटविण्यात आलं होतं, याचं कोणताही स्पष्टीकरण तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी अद्यापही दिलेलं नाही.
4 वर्षांपूर्वी -
कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या अभिनेत्याचं मनसेतर्फे मनापासून अभिनंदन - राज ठाकरे
सिनेसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना जाहीर झाला. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रजनीकांत यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव केला जाणार असल्याची घोषणा केली.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाला कोरोनाचं काही पडलेलं नाही | केवळ आम्ही सत्तेत कसं येऊ शकतो याकडेच लक्ष
राज्यात सध्या अनेक विषयांवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अहमदाबादमध्ये शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाली असं वृत्त समोर आलं आणि महाराष्ट्रात राजकीय वारे वाहण्यास सुरुवात झाली. अर्थात राष्ट्रवादीने ही भेट झाली नसल्याचे म्हटले असले तरी चर्चा या सुरुच आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का? | पवारांची अहमदाबादला भेट? | जयंत पाटील यांचं उत्तर
राज्यात सध्या अनेक विषयांवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अहमदाबादमध्ये शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाली असं वृत्त समोर आलं आणि महाराष्ट्रात राजकीय वारे वाहण्यास सुरुवात झाली. अर्थात राष्ट्रवादीने ही भेट झाली नसल्याचे म्हटले असले तरी चर्चा या सुरुच आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सध्या लॉकडाउनचा विचार नाही, पण यंत्रना सज्ज ठेवणं सरकारचं काम - आरोग्यमंत्री
महाराष्ट्रात तुर्तास लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, आपली सर्व चर्चा त्याच दिशेने सुरु आहे. पण याचा अर्थ राज्यात लॉकडाऊन लागेलच, असा नाही. मात्र राज्य सरकारला तशी तयारी करुन ठेवणे हे गरजेचे असते, असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.
4 वर्षांपूर्वी -
मनसुख हिरेन प्रकरणी परमबीर सिंग ATS'च्या पत्रांना रिप्लाय देत नव्हते | मोठा खुलासा
सध्या मनसुख हिरेन प्रकरणी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याभोवती देखील संशयाचे वादळ निर्माण होताना दिसत आहे. एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेन हत्येचा खुलासा यापूर्वीच झाला असता. जर मुंबई पोलिसांनी योग्य सहकार्य केले असते. महाराष्ट्र एटीएसमधील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, हे प्रकरण याआधीच उलगडलं असतं, परंतु मुंबई पोलीस मुख्यालयाकडून आम्हाला सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची परवानगी दिली नाही. त्यासाठी आम्ही तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना चार पत्रही पाठवली होती, मात्र त्यांच्याकडून कोणताही रिप्लाय आला नाही. त्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनले.
4 वर्षांपूर्वी -
रेडीरेकनर दरात वाढ नाही | मुद्रांक शुल्क सूट संपुष्टात
करोनाचे संकट अद्यापही कायम असल्याने आणि गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात वाढवण्यात आलेल्या वार्षिक मूल्यदरांना (रेडीरेकनर) अद्याप सहाच महिने झाले असल्याने यंदा रेडीरेकनर दरांत वाढ न करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. त्यानुसार १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या आर्थिक वर्षासाठी सध्याचेच दर कायम ठेवण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
वय वर्ष ४५ पेक्षा अधिक | आजपासून कोरोना लसीकरण | हे आहेत तुमचे प्रश्न आणि त्याची उत्तरं
देशात आजपासून ४५ वर्षांवरील सर्व लोक कोरोना लसीचे डोस घेऊ शकतील. आतापर्यंत आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्स, ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेले आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाच लस दिली जात होती. आता या लसीकरण अभियानात सहभागी लोकसंख्या ही कामासाठी बाहेर पडणारी आहे. त्यांना घरात राहणे शक्यच नाही. म्हणूनच १ एप्रिलनंतर भारत जगातील सर्वाधिक लसीकरण करणारा देश ठरेल, असे सरकारला वाटते.
4 वर्षांपूर्वी -
स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळा संपन्न | सरकारमधील प्रमुख नेत्यांची उपस्थिती
बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबई येथील स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर असे मोठे नेते या कर्यक्रमाला उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुखांवरील आरोप | चौकशीसाठी गठीत करण्यात आलेली समिती म्हणजे निव्वळ धुळफेक - फडणवीस
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपासंदर्भात चौकशी करण्यासाठी नेमलेली न्यायालयीन समिती म्हणजे निव्वळ धुळफेक असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
Breaking | उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना झापलं | विचारले अनेक गंभीर प्रश्न
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावतीने अनिल देशमुख यांच्याविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे आहेत. परमबीर सिंग यांचे वकील विक्रम ननकानी बाजू मांडत आहेत. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणी सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर | विद्यमान नगरसेवक आणि माजी नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून इतर सर्वच पक्षातील नेतेमंडळी राष्ट्रवादी, शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. मागील काही दिवसांपासून माजी खासदार, आमदार आणि नगरसेवक राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो