महत्वाच्या बातम्या
-
राष्ट्रवादी-काँग्रेसने मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार नाही अशीच खबरदारी घेतली
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत बनू लागल्याचं दिसत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरणही तापताना दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला धारेवर धरलं आहे. “१५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते.
4 वर्षांपूर्वी -
वाझेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसने खळबळ | जगाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे | सहकारीच मला अडकविण्याच्या..
3 मार्च 2004 रोजी सीआयडीमधील काही अधिकाऱ्यांनी मला एका खोट्या प्रकरणात अटक केली होती. मला केलेली ही अटक आजपर्यंत अयोग्य आहे. या इतिहासाची मला आता पुन्हा जाणीव करुन देत आहे. माझे सहकारी, अधिकारी मला चुकीच्या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा सचिन वाझे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सचिन वाझेंकडून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल | मनसुख प्रकरणी अडकविण्याचा प्रयत्न होण्याची शंका?
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात चर्चेत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्ष सचिन वाझे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. विरोधी पक्षाच्या दबावानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 10 मार्च रोजी सभागृहातून घोषणा केली होती की वाझे यांना क्राइम ब्रांचमधून हटवण्यात आले. त्यानंतर 12 मार्च रोजी रात्री उशीरा त्यांना क्राइम ब्रांचमधून स्पेशल ब्रांचला बदली करण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
झोपडी पाडल्यापासून SRA प्रकल्पातील घरे ५ वर्षांनी विकता येणार | लवकरच नियमात बदल
SRA प्रकल्पातील सदनिका ५ वर्षांनी विकण्याची मुभा देतानाच हा कालावधी झोपडी पाडल्यापासूनचा गृहीत धरावा, यासाठी लवकरच नियमात बदल करण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी सांगितले. म्हाडा व एसआरएच्या संयुक्त विद्यमाने कोळीवाडे वगळता मुंबईतील किनाऱ्यालगतच्या झोपडपट्टयांच्या विकासाबाबत दीड महिन्यात धोरण तयार करणार असल्याचे देखील जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
भाजप आ. मंगलप्रभात लोढा आणि त्यांच्या मुलाविरोधात खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा
भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह त्यांच्या मुलाविरोधात कोर्टाच्या आदेशाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा शुक्रवारी दाखल करण्यात आला. सदर प्रकरणी ज्वाला रिअल इस्टेट प्रा. लि. व मायक्रोटेक डेव्हलपर्सचे मालक मंगलप्रभात लोढा, त्यांचा मुलगा अभिषेक तसेच सुरेंद्रन नायर यांच्याविरोधात खंडणी, फसवणूक, धमकी या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई विद्यापीठ मनविसेचे अध्यक्ष आणि मनविसेचे उपाध्यक्ष अॅड. संतोष धोत्रेंचा शिवसेनेत प्रवेश
शिवसेनेकडून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला जोरदार धक्का देण्यात आला आहे. मनविसेचे मुंबई विद्यापीठ अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य मनविसेचे उपाध्यक्ष अॅड. संतोष धोत्रे यांनी मनसेला रामराम ठोकत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेमुळे तिकीट कापलं गेल्याने किरीट सोमैयांचा जीव अजून वर-खाली होतोय? - सविस्तर वृत्त
एकाबाजूला किरीट सोमैया ऑनलाईन सहज उपलब्ध होणारे सातबारा उतारे डाउनलोड करून काहीतरी मोठं सिक्रेट शोधून काढल्याचा ट्विटर आणि पत्रकार परिषदेत कांगावा करत आहेत. त्यात राज्य सरकार आणि स्वतः विरोधी पक्ष त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्या आरोपांची हवाच निघून जातेय. त्यात आरोप करण्याचा त्यांचा मोठा इतिहास असल्याने माध्यमं देखील त्यांना सिरीयस घेताना दिसत नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली | सहआयुक्तांचाही वृत्ताला दुजोरा
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अडचणीत आलेले गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर ) विभागात बदली करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस मुख्यालयातून गुरुवारी रात्री अधिकृत पत्रक निघाले आहे. त्यांच्या बदलीच्या वृत्ताला सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारांबे यांनी दुजोरा दिला आहे. शुक्रवारी ते पदभार स्वीकारतील अशीही माहिती समजते आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्लॅस्टर ममतांना आणि दुखणं भाजपला | शिवसेनेचं भाजपवर टीकास्त्र
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पश्चिम बंगालच्या विधानसभेचं रण चांगलंच तापलं आहे. आरोप प्रत्यारोपांचे वार सुरु झालेत. अशातच सामना अग्रलेखातून ममतांना वाघिण संबोधत भाजपवर शरसंधान करण्यात आलं आहे. ममतांना प्लॅस्टर, भाजपला दुखणं, अशा मथळ्याखाली अग्रलेख लिहून भाजपची नौका आणखीनच खोल पाण्यात गेली, असं सुचवत सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
धारावी पॅटर्न राबविण्यात मोठं योगदान | ACP रमेश नांगरे यांचे हार्टअटॅकने निधन
मुंबई पोलीस कुटुंबियांसाठी अत्यंत दुःखद बातमी आज आली आहे. कोरोना संसर्गाचा मुंबईतील सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी भागात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी झटणारे धारावीचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सध्या साकिनाका येथे नेमणुकीस असलेले सहायक पोलीस आयुक्त रमेश नांगरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले.
4 वर्षांपूर्वी -
MPSC आयोगाचा एकतर्फी निर्णय | सरकारला विचारात घेतलं नव्हतं | मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेबाबत लोकसेवा आयोगाच्या परिपत्रकात काही सांगण्यात आलेले नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अजुनही परिस्थिती नियंत्रणात | पण नियम न पाळल्यास काही भागांमध्ये लॉकाडाउन - मुख्यमंत्री
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे. अनेक शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. दरम्यान औरंगाबादेतही अंशतः लॉकडाउन लावण्यात आले आहे. तसेच नागपुरातही 11 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आले. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. नियम न पाळल्यास काही भागांमध्ये लॉकाडाउन लावण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
MPSC परीक्षा स्थगित | 14 मार्च रोजी होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSC ची नियोजित परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 14 मार्च रोजी नियोजित असलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगाने त्या संबंधीची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे गुरुवारी जारी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविड लसीचा पहिला डोस घेतला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविड लसीचा पहिला डोस घेतला. दरम्यान कोरोनाचा धोका वाढतो आहे, पात्र असल्याने सर्वांनी मनात शंका न ठेवता नागरिकांनी लस टोचून घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. कोरोना लसीकरण वेगाने वाढत आहे, तरी काही दिवसात काही ठिकाणी कडक लॉकडाऊन करावे लागेल, त्यामुळे काळजी घ्या, लॉकडाऊनबाबत येत्या एक दोन दिवसात निर्णय घेऊ असे देखील संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अन्वय नाईक आत्महत्या | किरीट सोमय्यांचा जीव वर खाली का होतो? | आज्ञा नाईक संतापल्या
आमच्यावर हात टाकण्यात आला होता. तेव्हाच्या तपास अधिकाऱ्याला कोणाचा आदेश होता हेदेखील बाहेर काढावं. मी आणि आई मनाचं काही सांगत नाही आहोत. आम्ही संशय व्यक्त करत नसून सुसाईड नोटमध्ये नाव देण्यात आलं आहे. तपास अधिकाऱ्याला आमची चौकशी करण्याचा आदेश कोणी दिला होता? ज्यांना समस्या आहे त्यांनी चर्चेला बसावं.. चाय पे चर्चा होऊन जाऊ द्या,” असं आव्हान यावेळी आज्ञा नाईकने दिलं. तसंच किरीट सोमय्यांचा जीव वर खाली का होतो? असा सवाल विचारला. अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक यांनी यावेळी महाराष्ट्र पोलिसांचा आपल्याला अभिमान असल्याचं सांगितलं. तसंच गरज लागल्यास मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ अशी माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई-महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास | पोलिसांचं तोंड काळं झालं बोलणं फडणवीसांना शोभतं का
मनसुख हिरेन प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रकारे विधानसभा हादरवून ठेवली तशीच भूमिका अन्वय नाईक प्रकरणात का घेतली नाही. अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. फक्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पण विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी निकाल दिल्याचे सांगून दिशाभूल केली, असा आरोप अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
तिथे फक्त संशय | अन्वय नाईक प्रकरणी सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावं तरी भाजपवाले शांत होते
अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीने गुरुवारी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन भाजप सरकारवर गंभीर आरोप केले. या दोघींनी मनसुख हिरेन प्रकरणाचा दाखला देत भाजपला धारेवर धरले. एका व्यक्तीला दोन ते तीन दिवसांत न्याय मिळतो. फक्त संशयावरुन अधिकाऱ्याची बदली केली जाते. परंतु, आमच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला, सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावे स्पष्टपणे आहेत. मग तेव्हा भारतीय जनता पक्षाने विधानसभा हादरवून का सोडली नाही, असा सवाल अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
आमच्यावर हात टाकणाऱ्या तपास अधिकाऱ्याला कोणाचा आदेश होता? - आज्ञा नाईक
मनसुख हिरेन प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रकारे विधानसभा हादरवून ठेवली तशीच भूमिका अन्वय नाईक प्रकरणात का घेतली नाही. अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. फक्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पण विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी निकाल दिल्याचे सांगून दिशाभूल केली, असा आरोप अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
अन्वय नाईक प्रकरण | सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय दिलेला नसताना फडणवीसांनी दिशाभूल केली
मनसुख हिरेन प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रकारे विधानसभा हादरवून ठेवली तशीच भूमिका अन्वय नाईक प्रकरणात का घेतली नाही. अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. फक्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पण विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी निकाल दिल्याचे सांगून दिशाभूल केली, असा आरोप अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
कर नाही त्याला डर कशाला? | सचिन वाझे स्वत:हून ATS कार्यालयात चौकशीसाठी हजर
कर नाही त्याला डर कशाला? याच उद्धेशाने पोलीस अधिकारी सचिन वाझे स्वतःहून ATS कार्यालयात हजर झाले आहेत. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने जवळपास १० तास चौकशी केल्याचं वृत्त आहे. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, माझा धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम