महत्वाच्या बातम्या
-
Sarkari Naukri | DFCCIL मध्ये 1099 पदांसाठी भरती | मुंबई-नागपूर कार्यालय
DFCCIL Recruitment 2021, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ व्यवस्थापक, कार्यकारी, कनिष्ठ कार्यकारी पदांच्या एकूण 1099 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विधानसभेत विरोधकांना प्रतिउत्तर | हे होते महत्त्वाचे मुद्दे
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. अत्यंत आक्रमक झालेल्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत थेट हिंदुत्व, बाबरी मशीद, शर्जील उस्मान, काश्मीर पंडीत, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यापासून ते युती तुटण्यापर्यंतच्या मुद्दयावरून भाजपला फैलावर घेतलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी भाजपला थेट निर्लज्जच संबोधलं. मुख्यमंत्र्यांचं हे रौद्ररुप पाहून भाजप सदस्यही चिडीचूप होते.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत कोरोना लस कुठे मिळणार? | वाचा २९ खासगी रुग्णालयांची यादी
कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षे व त्यावरील नागरिक आणि ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील सहआजार असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून मुंबईसाठी खूप मोठा दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यामुळे सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही लस घेता येणार आहे. मुंबईतही २९ खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामी यांना आज विधिमंडळात हजर राहण्यासाठी समन्स
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना विधिमंडळाच्या हक्कभंग समितीसमोर हजर राहण्यासाठी पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे. यापूर्वी नोटीस बजावूनही अर्णब गोस्वामी हजर न राहिल्याने त्यांना हे समन्स बजावण्यात आले असून, उद्या बुधवारी अर्णब गोस्वामी यांना विधिमंडळात हजर राहावे लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
स्वयंघोषित फिल्मी झाशीची राणी कंगनाला शिवसैनिकांची भीती वाटतेय | असं पाऊल उचललं....
बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चंडेल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये दाखल करण्यात आलेले तिन्ही खटले हिमाचल प्रदेशमधील न्यायालयात हलवण्यात यावे अशी मागणी कंगनाने केली आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा कंगना राणावतने केला आहे. कंगनावर सध्या ३ खटले सुरू आहे. वादग्रस्त ट्वीट केल्या प्रकरणी कंगनावर खटलाही सुरू आहे.
4 वर्षांपूर्वी -
अजब मोदी सरकार | प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये म्हणून प्लॅटफॉर्म तिकीट १० वरून ५० रु
सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात रेल्वे विभागाने रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील निवडक रेल्वे स्टेशवर प्लॅटफॉर्म तिकीटासाठी आता 10 रुपयांऐवजी 50 रुपये द्यावे लागणार आहेत. सेंट्रल रेल्वेने प्लॅटफॉर्ट तिकीटांमध्ये पाचपट वाढ केली आहे. प्लॅटफॉर्म तिकीटांच्या किमती वाढवण्यात आलेल्या स्टेशनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CST),दादर आणि लोकमान्य तिलळ टर्मिनस सामील आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मंत्रालयात विनामास्क, विना RTPCR चाचणी प्रवेश बंदी | राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट टाळली
कोरोनाने राज्यात धुमाकूळ घातल्यापासून सरकारने वारंवार मास्क घालणे, सोशल डिस्टन्स पाळणे या उपाययोजना पाळायल्या सांगितल्या आहेत. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच कधीच मास्क घातला नाही. दरम्यान आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी विधान भवनात येणार होते. परंतु राज ठाकरे विधान भवनात आल्यावर त्यांना कोविड १९ संसर्ग RTPCR चाचणी करणं आवश्यक होतं. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही कोरोना चाचणी केली नसल्यामुळे त्यांना विधान भवनात येता आलं नाही.
4 वर्षांपूर्वी -
घरगुती ग्राहक आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोपर्यंत तोडणार नाही - उपमुख्यमंत्री
वीज कनेक्शन तोडण्याच्या मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. जोपर्यंत चर्चेतून मार्ग निघत नाही तोपर्यंत राज्यातील घरगुती ग्राहक आणि शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी आज विधानसभेत केली आहे. त्यामुळे राज्यातील हजारो वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरण | सर्व शाखांचे ऑडिट होणार | दरेकरांच्या अडचणीत वाढ
मागील काही दिवसांमध्ये विविध मुद्द्यांवरुन महाविकासआघाडी सरकारविरुद्ध रान उठवण्यात आघाडीवर असलेले भाजप आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. प्रवीण दरेकर यांच्यावर आरोप असलेल्या मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणाची आता खोलात जाऊन चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी सहकार विभागाने मुंबै बँकेतील विविध शाखांचे सविस्तर लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
Religious Adhyatma | आज अंगारकी संकष्टी चतुर्थी | गणेशाच्या दर्शनासाठी मंदिराबाहेर रांगा
आज म्हणजे 2 मार्च फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. म्हणून त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं. या दिवशी गणेशाची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात. दोन्ही चतुर्थी गणेशाला समर्पित आहेत. शुक्ल पक्षावर पडणार्या चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवार यांनी मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये घेतली कोरोना लस
महाराष्ट्रासह देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला आहे. यात 60 पेक्षा जास्त वय असलेले आणि 45 पेक्षा जास्त वय असलेल्या आजारी व्यक्तींना सामील करण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मुंबईतील जे.जे हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोना लस घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी 400 कोटी मंजूर | राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. यात 8 मार्चला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. शेतकरी आंदोलन, मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण अशा विविध मुद्द्यांनी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांनी मुद्दे शांतपणे मांडावे जेणेकरून गोंधळ होणार नाही असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
वैधानिक विकास महामंडळावरून अजितदादा-फडणवीस आमने-सामने
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. यात 8 मार्चला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. शेतकरी आंदोलन, मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण अशा विविध मुद्द्यांनी अधिवेशन वादळी ठरताना आहे.
4 वर्षांपूर्वी -
गदारोळ घालणाऱ्या प्रतिनिधीकडे पाहून फडणवीसांनी ए काय रे असा उल्लेख करताच अजून गदारोळ
महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. शेतकरी, मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल, संजय राठोड यासारख्या अनेक मुद्द्यांनी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. विरोधकांचे मुद्दे त्यांनी शांतपणे मांडावेत, गोंधळ करु नये. विरोधकांनी मांडलेल्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा होईल, गोंधळाने काहीही साध्य होणार नाही, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी घेतली आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका करत सभागृहातून बाहेर पडण्याचा इशारा दिला.
4 वर्षांपूर्वी -
इंधन - गॅस दरवाढीचा निषेध | काँग्रेसचे आमदार सायकलवरून विधानभवनात
‘अक्कड बक्कड बंबे बो, 80, 90 पुरे 100’, ‘आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का?’, असे फलक हातात घेऊन काँग्रेसने इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. काँग्रेसच्या सर्व मंत्री, आमदार आणि नेत्यांनी आज सायकलवरून प्रवास करत विधान भवन गाठले. यावेळी काँग्रेसचे सर्व बडे नेते उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
अखेर संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. चर्चगेटमधील छेडा सदन निवासस्थानाहून दुपारी अडीचच्या सुमारास संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यानंतर वर्षा बंगल्यावरील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
...तर शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे सर्व सदस्य राजीनामे देतील - फडणवीस
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा तयार केला जात आहे. पण राज्यातील मंत्रीच जर महिलांच्या अत्याचारात सहभागी असतील तर हा कायदा काय कामाचा?, असा सवाल करतानाच राठोडांनी राजीनामा दिला नाही तर शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे सर्व सदस्य राजीनामे देतील, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
संजय राठोड सपत्निक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला
विरोधकांकडून राजीनाम्यासाठी दबाव येत असल्याच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री संजय राठोड आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राठोड हे पत्नी आणि मेव्हण्यासह कॅबिनेट बैठकीपूर्वीच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राठोड यांच्या बाबत कॅबिनेटपूर्वीच काही मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि. कंपनी आहे काय? - आ. आशिष शेलार
महाविकासआघाडीची सत्ता आल्यापासून जुने मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असतो. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यानंतर आता भाजपनेही मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत सेनेचं नाक कापण्यासाठी तयारी सुरु केली आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाने आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनाही प्रशासकीय डावपेच खेळून भारतीय जनता पक्षाची कोंडी करताना दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
मंत्री गर्दी करून धुडघूस घालतायेत आणि शिवजयंती, मराठी भाषा दिनाला नकार - राज ठाकरे
राज्य सरकारने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यामुळे मनसेचे (MNS) नेते आक्रमक झाले आहेत. आम्ही मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम (Marathi Bhasha Din) योग्य ती खबरदारी घेऊन पार पाडू. बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही, असा खोचक टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB