25 December 2024 11:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS
x

पंकजा मुंडेंकडून बंधू धनंजय मुंडेंच्या तब्येतीची चौकशी

Pankaja Munde, Dhananjay Munde, Corona patient

मुंबई, १२ जून : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांचे दोन स्वीय सहाय्यक आणि गाडी चालकाला देखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्री मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत धनंजय मुंडे सहभागी झाले होते. या अगोदर सोमवारी मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणू निदान प्रयोग शाळेचे उदघाटन देखील केले होते. आता मुंडे यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

धनंजय मुंडे हे मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आले होते. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच बीड जिल्हाधिकारी कार्यालयातसुद्धा अनेक बैठकांमध्ये त्यांनी सहभाग नोंदविलेला होता. विशेष म्हणजे १० जून रोजी झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमास धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आले होते.

दरम्यान, धनंजय मुंडेंच्या या आजारपणामुळे बहिण-भावातील दुरावलेले नाते जवळ आले आहे. कारण, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी तातडीने धनंजय यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. ‘बंधू तब्येतीची काळजी घे, लवकर बरा होऊन घरी ये’ असे पंकजा यांनी धनंजय यांना फोनवरून सांगितले. या निमित्ताने राजकारणापलीकडेही नाती महत्त्वाची असतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही दापोली येथे माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांना लवकर स्वास्थ्य लाभावे म्हणून प्रार्थना केली.

 

News English Summary: Due to Dhananjay Munde’s illness, the estranged relationship between the brothers and sisters has come closer. Because, BJP leader Pankaja Munde has immediately contacted Dhananjay on the phone and inquired about his health. “Take care of your health, brother, get well soon and come home,” Pankaja told Dhananjay over the phone.

News English Title: Pankaja Munde calls Dhananjay Munde to inquire about his health News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x