Parambir Singh | परमबीर सिंग यांनी कसाबचा फोन ISI ला विकला असावा | माजी ACP'चा खळबळजनक आरोप
मुंबई, 26 नोव्हेंबर | मुंबई पोलिसात एसीपी राहिलेल्या शमशेर खान पठाण यांनी आज परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप मुंबईत घडलेल्या 26/11 प्रकरणाशी संबंधित आहेत. त्यावेळी परमबीर सिंग हे ATS चे DIG होते. परमबीर सिंग यांनी दहशतावादी कसाबचा फोन हा आयएसआयला विकला असावा असा अत्यंत गंभीर आरोप निवृत्त एसीपी शमशेर खान पठाण (Parambir Singh) यांनी केला आहे.
Parambir Singh was the DIG of ATS. Retired ACP Shamsher Khan Pathan has made a very serious allegation that Parambir Singh may have sold the phone of terrorist Kasab to ISI :
काय म्हटलं आहे शमशेर खान पठाण यांनी:
26/11 चा हल्ला ज्यावेळी मुंबईवर झाला. त्यावेळी परमबीर सिंग हे त्यावेळी एटीएसचे प्रमुख होते. पण त्यांना त्यावेळी आपल्या देशाऐवजी शत्रू राष्ट्राला पाठिंबा देणं उचित वाटलं असावं. त्यांची त्यावेळची कृती हेच सांगते. अजमल आमिर कसाब हा दहशतवादी जिवंत पकडला गेला होता. त्यावेळी त्याचा मोबाईल फोन हा परमबीर सिंग यांनी ताब्यात घेतला होता. त्या फोनचं पुढे काय झालं ते समजू शकलं नाही कारण तो फोन परमबीर सिंग यांनी ISI ला विकला असावा. कसाबचा खटला चालला त्यावेळी किंवा त्या दरम्यान कधीही या फोनबाबत कुठलंही स्पष्टीकरण समोर आलं नाही.
प्रसार माध्यमांशी बोलत असताना निवृत्त एसीपी शमशेर खान यांनी हा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की मी तुम्हाला ज्या फोनबद्दल सांगतो आहे तो तोच फोन आहे ज्यावर कसाबला पाकिस्तानी हँडलर्स नेमकं काय करायचं आहे त्याच्या सूचना करत होते. त्या फोनमध्ये ही माहितीही असू शकते की ही घटना घडवण्यात भारतातल्या कुणाचा हात आहे? त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपी असतील त्यांना तातडीने अटक करण्याची गरज आहे.
आणखी काय म्हणाले शमशेर खान?
शमशेर खान पठाण यांनी जुलै 2021 मध्ये याच मुद्द्यावर मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले होते. ‘मला हे प्रकरण प्रसिद्ध करायचे नव्हते कारण ते देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांना याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली. पण आता हे पत्र लीक झाल्यामुळे मला खात्री आहे की पोलिसांकडे सिंग यांच्या विरोधात काहीतरी आहे आणि त्यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करावी. निवृत्तीनंतरची सामाजिक जबाबदारी म्हणून मी हे केले आहे.’
पीआय एन. आर. माळी यांच्याशी मी या विषयावर सविस्तर चर्चा केली होती. दहशतावादी अजमल आमिर कसाबचा मोबाईल फोन त्यावेळी एटीएस डीआयजी असलेल्या परमबीर सिंग यांनी काढून घेतला होता. यासंबंधीची माहितीही त्यांनी त्यावेळी ड्युटीवर असलेल्या हवालदाराकडून घेतली होती. या प्रकरणी तपास अधिकारी रमेश महाले होते. मात्र परमबीर सिंग यांनी हा मोबाईल त्यांच्याकडे सोपवला नाही. परमबीर सिंग यांनी हा मोबाईल तपास अधिकारी रमेश महाले यांच्याकडे सोपवणं खूप आवश्यक होतं. कारण हा प्रकार म्हणजे अत्यंत महत्त्वाचा पुरावा नष्ट करणं आणि शत्रू राष्ट्राला मदत करणं असाच आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Parambir Singh may have sold the phone of terrorist Kasab to ISI said Retired ACP Shamsher Khan Pathan.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय