22 November 2024 2:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Parambir Singh Meet with Sachin Waze | धक्कादायक... वाझे आणि परमबीर सिंग यांच्यात १ तास चर्चा | चौकशी होणार

Parambir Singh Meet with Sachin Waze

मुंबई, 29 नोव्हेंबर | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन वाझे यांच्यात आज तब्बल तासभर एका खोलीत चर्चा झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. त्यामुळे आता या भेटीची मुंबई पोलिसांकडून चौकशी केली (Parambir Singh Meet with Sachin Waze) जाणार आहे.

Parambir Singh Meet with Sachin Waze. It has recently come to light that Parambir Singh and Sachin Waze had a one-hour discussion in a room today. Therefore, this visit will now be investigated by the Mumbai Police :

परमबीर सिंग आणि सचिन वाझे हे दोघेही चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. याच दरम्यान, दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. दरम्यान, आता मुंबई पोलीस या गोष्टीचा तपास करत आहेत की, ही भेट नेमकी कोणाच्या परवानगी झाली. दरम्यान, सचिन वाझे आणि परमबीर सिंग हे एक खोलीत बसून तब्बल तासभर चर्चा करत असल्याची बातमी समोर आली तेव्हा मुंबई पोलिसात देखील एकच खळबळ माजली. ज्यानंतर मुंबई पोलिसांची एक टीम तात्काळ चांदीवाल आयोगाच्या इमारतीत पोहचली आणि त्यांनी या भेटीबाबत तपास सुरु केला.

मुंबई पोलिसांना हेच जाणून घ्यायचं आहे की, या दोन्ही आरोपींना एकमेकांना भेटण्यासाठी नेमकी कोणी परवानगी दिली होती. जर त्यांना भेटण्याची परवानगी नव्हती तर मात्र, मुंबई पोलीस आता त्यांच्या भेटीची स्वतंत्रपणे चौकशी करु शकतं. याच दरम्यान, सचिन वाझेला जेलमधून आयोगासमोर हजर करणाऱ्या पथकाची देखील चौकशी केली जाऊ शकते.

नेमकं काय घडलं?
परमबीर सिंग आणि सचिन वाझे हे एका खोलीत सुमारे तासभर एकमेकांशी बोलत होते त्यामुळे न्यायमूर्ती चांदीवाल आयोगासमोर अनिल देशमुख यांच्या वकिलाने या गोष्टीला जोरदार आक्षेप घेतला होता. ही बातमी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली जे नंतर न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाच्या इमारतीत पोहोचले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी ठाणे पोलिसांकडे याप्रकरणी तपास करण्यास सांगितलं आहे. वाझे हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून सिंग आणि वाझे याच्याविरुद्ध गोरेगाव येथे दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यातही तो आरोपी आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Parambir Singh Meet with Sachin Waze almost for 1 hour will be enquire by Mumbai Police.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x