परमबीर सिंग राज्यपालांना भेटणार | स्वतःला वाचवण्यासाठी भाजपच्या इशाऱ्यावर हालचालींचा आरोप?

मुंबई, २२ मार्च: मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्या पत्राने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. सिंग यांनी थेट गृहमंत्र्यांवरच आरोप केलेले असल्याने विरोधीपक्ष भाजपाकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिंग यांच्या पत्रावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक झाल्याचं दिसत आहे.
दरम्यान, याचविषयावरून म्हणजे केवळ आरोप करण्यावरून या प्रकरणात सक्तवसुली संचालनालय (ईडी) लक्ष घालण्याची शक्यता आहे. गृहमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्याला मुंबईतून महिन्याला १०० कोटींची वसुली करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप केल्याने त्यामागील आर्थिक कनेक्शन त्याच्याकडून तपासले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गृहमंत्री देशमुख व राज्य सरकारच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात सचिन वाझे यांना १०० कोटी वसूल करण्याचे टार्गेट देण्यात आले होते, असे नमूद केले आहे. हे पत्र राज्यपालांनाही आज, सोमवारी देणार असल्याचे परमबीर सिंग यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यामागील आर्थिक कनेक्शन तपासण्यासाठी हे प्रकरण ‘ईडी’कडे पाठविले जाऊ शकते. त्याचप्रमाणे आरोपांचे गांभीर्य समजून‘ईडीही’ स्वतःहून तपास करू शकते. परमबीर यांचा जबाब नोंदवून त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. याबाबत विरोधी पक्षाकडून तक्रार नोंदवली गेल्यासही ‘ईडी’कडून हे प्रकरण हाताळले जाऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
धक्कादायक म्हणजे सध्या परमबीर सिंग यांना दिल्लीतून हॅण्डल केलं जातं असल्याचा संशय बळावू लागला आहे. कारण, राजकीय विरोधकांप्रमाणे ते एक एक घटना तडीस घेऊन जातं आहेत आणि राज्य सरकार अस्थिर कसं होईल याची खात्री करत आहेत. एखादे विद्यमान IPS अधिकारी असे राज्यपालांकडे जाणे हे ऐतिहासिक आहे. सध्या राज्यातील या प्रकरणात केंद्र सरकार संबंधित विभाग चौकशी करत आहेत. त्यामुळे भविष्यात त्यांना यातून बाहेर काढण्याचं आमिष देण्यात आल्याचं वृत्त सूत्रांनी दिलं आहे. त्यामुळे ते दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर एखाद्या राजकीय विरोधकांप्रमाणे योजना आखात असल्याचं दिसतंय. दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राहिलेले अधिकारी भाजपात मंत्रिपद उपभोगून आले आहेत. तसेच राजकीय आमिष त्यांना देण्यात आल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. त्यामुळेच ते अशा भेटी घेऊन राज्यातील आणि केंद्रातील विरोधकांच्या हेतूला अप्रत्यक्षरीत्या बळ देत आहेत असं म्हटलं जातंय. यावर महाविकास आघाडीचे नेते काय पाऊल उचलणार ते पाहावं लागणार आहे.
भाजप नेत्यांशी देखील त्यांच्या हालचालींचं टाईमिंग जुळत असल्याने सत्ताधाऱ्यांची शंका बालवणार.
100 कोटी रुपयांची वसूली समोर आली आहे आमची मागणी आहे #Enforcementdirecotate ने याची चौकशी करावी
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) March 22, 2021
News English Summary: In a letter to Chief Minister Uddhav Thackeray, Parambir Singh said that Sachin Waze was targeted to recover Rs 100 crore. The letter will be handed over to the governor today, Monday, Parambir Singh said. Therefore, the case can be referred to the ED to check the financial connection behind it.
News English Title: Parambir Singh will meet state governor today on Anil Deshmukh allegations letter news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल