15 January 2025 4:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

सामान्य लोकं व शिवसैनिकांचाही कोरोनाने जीव जातोय आणि मुख्यमंत्री राजकीय सौदेबाजीत

Parners 5 Corporators, NCP, Shivsena

मुंबई, ८ जुलै : पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. 4 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पाचही नगरसेवक शिवसेनेत परतले आहेत. पाचही नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. याआधी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह या पाचही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत 20 मिनिटं चर्चा केली होती. या संपूर्ण प्रकरणात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्या मुत्सद्देगिरीला यश आल्याचं म्हटलं जात आहे.

शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांनी अवघ्या चार दिवसांत घरवापसी केली आणि सात दिवसाच्या महानाट्यावर अखेर पडदा पडला. पाचही नगरसेवकांनी ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुन्हा शिवबंधन बांधलं. तत्पूर्वी सर्व नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची भेट घेतली. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी मंत्रालयात ही भेट घडवून आणली. अजीत पवार, पाच नगरसेवक, हसन मुश्रीफ यांच्यात अर्ध्या तास चर्चा झाली. नंतर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे सर्व नगरसेवकांना मातोश्रीवर घेऊन आले.

मात्र त्यानंतर समाज माध्यमांवर महाविकास आघाडी आणि विशेष करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध प्रचंड संताप व्यक्त होतं असल्याचं पाहायला मिळत आहे. एकाबाजूला राज्यात कोरोनाने थैमान घातलेले असताना आणि एकट्या महाराष्ट्राची तुलना अनेक देशांच्या रुग्णसंख्येला मागे टाकत असताना देखील मुख्यमंत्री यासर्व राजकीय सौदेबाजीत किती मनापासून गुंतले आहेत याचा जिवंत अनुभव राज्यातील जनता घेत आहे. महाराष्ट्रात आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे आणि आरोग्य मंत्री सध्या कोरोना रुग्नांची आकडेवारी जाहीर करून “मीच माझा रक्षक” हॅशटॅग वापरून बरंच काही सांगत आहेत.

राज्यातील सामान्य नागरिक आरोग्य व्यवस्थेवरून हैराण आहे, शेकडोने सामान्य लोकं प्रतिदिन प्राण सोडत आहेत, इतकंच नव्हे तर शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा देखील यामध्ये मृत्यू झालेला असताना मुख्यमंत्री मात्र राजकीय सौदेबाजीत स्वतः स्वस्त असल्याचं महाराष्ट्र पाहतो आहे. परिणामी समाज माध्यमांवर मुख्यमंत्र्यांच्या असंवेदलशील वागण्यावरून अत्यंत संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

News English Summary: All the five Shiv Sena corporators in Parner Nagar Panchayat have returned home. All the five corporators who joined NCP on July 4 have returned to Shiv Sena. All the five corporators went to Matoshri in Mumbai and rejoined the Shiv Sena in the presence of Chief Minister Uddhav Thackeray.

News English Title: Parners 5 Corporators who joins NCP to return in Shivsena News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x