22 January 2025 3:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई
x

पार्थ पवार सरकारचा भाग नसल्याने त्यांच्या मागणीवर आम्ही प्रतिक्रिया देणार नाही

Parth Pawar, Supreme court decision, Minister Anil Parab, Sushant Singh Rajput

मुंबई, १९ ऑगस्ट : सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश देताना प्राथमिकदर्शी मुंबई पोलिसांनी कोणतंही चुकीचं काम केल्याचं सूचवत नसल्याचं म्हटलं आहे. न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांनी मर्यादित तपास केला असून एफआयआर दाखल केला नसल्याचं न्यायालयाने निदर्शनास आणलं.

अनिल परब म्हणाले की, कोर्टाने मुंबई पोलिसांच्या तपासाला चुकीचं म्हटलं नाही. या परिस्थितीत गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देऊ की नाही यावर आम्ही निर्णय घेऊ. महाराष्ट्र सरकारचं फक्त असं म्हणणं होतं की या खटल्याची चौकशी मुंबई पोलिसांना द्यावी आणि आवश्यक असल्यास हा खटला नंतर सीबीआयकडे पाठवावा. ही घटना मुंबईत घडली असल्याने मुंबई पोलिसांनी याची चौकशी करायला हवी होती असं त्यांनी सांगितले. तसेच पार्थ पवारांनी केलेल्या सीबीआय चौकशीच्या मागणीबाबत तेच सांगू शकतील, ते सरकारचा भाग नाहीत, त्यामुळे त्यांच्या मागणीवर आम्ही प्रतिक्रिया देणार नाही, असं अनिल परब म्हणाले.

आदित्य ठाकरे यांचं नाव खराब करणं हा विरोधकांचा अजेंडा आहे. सरकार आले नाही म्हणून पोटशूळ उठला आहे. सरकार चांगलं चाललं आहे, त्यामुळे सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. विरोधक काय म्हणतात, यापेक्षा घटना काय म्हणते याला आम्ही महत्त्व देतो. याप्रकरणी राजकारण करणं एवढंच विरोधकांचं काम आहे, अशी टीका परब यांनी केली आहे.

 

News English Summary: That is all that can be said about Parth Pawar’s demand for a CBI inquiry, he is not part of the government, so we will not respond to his demand, “said Minister Anil Parab.

News English Title: Parth Pawar is not a part of state government so no reaction from our end after Supreme court decision says Minister Anil Parab News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x