10 January 2025 3:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: BHEL Penny Stocks | कुबेर कृपा करणारा 75 पैशाचा पेनी शेअर, यापूर्वी 1775 टक्के परतावं दिला - Penny Stocks 2025 Bank Account Alert | 'या' बँक FD वर देतात घसघशीत परतावा; 9 टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज, पैशाने पैसा वाढवा Itel Zeno 10 | इंटेल Zeno 10 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ 5999 रुपये, स्मार्टफोन मध्ये AI लेन्सचा देखील समावेश Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER
x

लोकांचे कोरोना काळातही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे सुरूच, हायकोर्टाकडून संताप | दिले हे आदेश

Maharashtra corona pandemic

मुंबई, ०२ जून | लोकांचे कोरोना काळातही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे सुरूच असल्यामुळे केवळ आर्थिक दंड आकारण्यासोबतच लोकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यावरही भर द्या, असे निर्देश राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला उच्च न्यायालयाने दिले आहेत. यावर पालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांपासूनच याची सुरूवात करावी, कारण तेही याबाबतीत गंभीर दिसत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांची तक्रार करण्याऱ्या नागरिकांना गंभीरतेने घेतले जात नाही. पोलिसांचा ही तक्रार 100 नंबरवर करण्याचा सल्ला किती व्यवहार्य आहे? असा सवालही बुधवारच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला.

2006 मध्ये मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या त्यांच्याच कायद्याची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्याची मागणी करत उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेला सामाजिक कार्यकर्ता अर्मिन वांद्रेवाला यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर महिन्याभरात उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

मुंबईत उघड्यावर थुंकणाऱ्या नागरिकांकडून थेट 1200 रुपये दंड आकारण्याचे तुमच्याकडे अधिकार असतानाही त्यांच्याकडून केवळ 200 रुपयेच दंड का वसूल करता?, असा सवाल करत सध्याच्या जमान्यात 200 रुपये दंडाला काही किंमत आहे का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने महानगरपालिका तसेच राज्य सरकारला केली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात महानगरपालिकेने हा दंड आता 1200 रूपये करत असल्याचे जाहीर केले. पण त्यानंतरही रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांची संख्या कमी झालेली नसल्याचे याचिकाकर्त्यांनी बुधवारच्या सुनावणीत अधोरेखित केले.

सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना वाढत असून या नागरिकांवर कठोर कारवाई करायला हवी, अशी मागणी करत अर्मिन वांद्रेवाला यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

 

News English Summary: The High Court has directed the state government and the Mumbai Municipal Corporation (MMC) to focus on raising public awareness in addition to imposing financial penalties as people continue to spit in public places even during the Corona period.

News English Title: People continue to spit in public places even during the Corona period said Bombay High court news updates.

हॅशटॅग्स

#BMC(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x