15 January 2025 5:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

ही तर 'सेव्ह-आरे' अभियान हाणून पाडण्याची योजना होती? अशा शिस्तबद्ध घडामोडी घडल्या!

SaveAarey, Save Aarey, Save Forest, Save Trees, AareyAikaNa, Ashwini Bhide, Amitabh Bachchan, RSS, BJP Maharashtra

मुंबई : मागील दोन आठवड्यापासून आणि विशेष करून #SaveAarey अभियानाने मुंबईमध्ये निसर्गाप्रती मोठी जनजागृती आणि उठाव होताना दिसला. त्यात सामान्य मुंबईकर, पर्यावरण तज्ज्ञ आणि संस्था तसेच अनेक राजकीय पक्षांनी सहभाग घेतल्याने सत्ताधाऱ्यांची निवडणुकीच्या तोंडावर झोप उडाल्याचं पाहायला मिळत आहे. हट्टाला पेटलेले निसर्गविरोधी सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी मात्र प्रसार माध्यमांच्या प्रश्नांनी मोठ्या गर्तेत अडकले होते. त्यात याच अभियानात हिंदी आणि मराठी चित्रपट श्रुष्टीतील लोकांनी सहभाग नोंदवल्याने प्रसार माध्यमांचे कॅमेरे मोठ्या प्रमाणावर आरे कॉलनीकडे वर्ग झाले.

मात्र #SaveAarey अभियान ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पेटताना पाहून सत्ताधारी आणि प्रशासकीय यंत्रणेने एक अभियानाच #SaveAarey हाणून पाडण्यासाठी राबविले असा संशय निर्माण झाला आहे आणि त्याला घटनाक्रम देखील तसाच घडला आहे. जागृत मुंबईकरांविरुद्ध आरएसएस, भाजप कार्यकर्ते, सरकार पुरस्कृत पत्रकार, सुपरस्टार अमिताभ बच्चन, सत्ताधारी आणि प्रशाकीय यंत्रणा सप्टेंबरच्या सुरुवातीलाच नियोजनबद्ध एकत्र आले होते असं म्हणावं लागेल.

घटनाक्रम-१ (तारीख १ सप्टेंबर २०१९)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ‘मुंबई काही मिनिटात’ हा मेट्रो ट्रेन संबंधित व्हिडिओ ट्विट केला. त्यावर मुंबईकरांनी देखील नकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडला तो देखील ‘काही मिनटात’. मात्र मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेला प्रोमो व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास त्यात अमिताभ बच्चन प्रकटताना दिसले. अर्थात जर मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ १ सप्टेंबरला ट्विट केला म्हणजे त्याचं शूटिंग आधीच पार पडलं असणार. या व्हिडिओत २०१० मध्ये मेट्रोला विरोध आणि माझ्या खाजगी आयुष्यात मुंबईकर डोकावणार अशी टीका करणारे सुपरस्टार अमिताभ बच्चन प्रकटले हे नवल म्हणावं लागेल.

घटनाक्रम-२ (तारीख १५ सप्टेंबर २०१९)
अचानक आरेतील प्रकल्पाला समर्थन करणारा ४०-५० लोकं मेट्रोच्या कार्यालयाकडे जमा होऊन प्रदर्शन करतात आणि #SaveAarey अभियान चुकीचं असल्याचे सांगत त्यांच्या पद्धतीने निसर्ग इतरांना आणि उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगू लागतात. त्यानंतर काही वेळातच त्यावर बातम्या प्रसिद्ध होतात. विशेष म्हणजे मेट्रो-३ संबंधित प्रशासकीय अधिकारी या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या लोकांना कार्यालयात भेटून पुष्पगुच्छ स्वीकारत फोटोसेशन करतात. त्यानंतर काही क्षणातच संबंधित लोकांनी मेट्रो-३ च्या समर्थनार्थ केलेल्या आंदोलनाचे मीडिया बाइट्स मुंबई मेट्रो-३च्या अधिकृत ट्विटवर झळकतात आणि ते देखील धन्यवाद मानत. पुढे आमच्या टीमने यांचा शोध घेतला असता ते आंदोलक भाजप कार्यकर्ते आणि आरएसएस स्वयंसेवक असल्याचं समोर आलं जे धक्कादायक होतं. त्याचे पुरावे खाली ज्यामध्ये व्हिडिओत दिसणारी व्यक्ती आरएसएस’शी संबंधित आहे आणि इतर आंदोलक हे भाजपचे कार्यकर्ते आहेत ते सिद्ध होतं. त्यासोबत मुंबई मेट्रो-३च्या अधिकृत ट्विटवर झळकलेला तो व्हिडिओ देखील आहे.


घटनाक्रम-३ (तारीख १७ सप्टेंबर २०१९)
२०१० मध्ये मुंबई मेट्रो प्रतीक्षा बंगल्यावरून जाणार असं समजताच अमिताभ बच्चन भला मोठा ब्लॉग लिहून संताप व्यक्त करताना म्हटलं होतं, ‘परंतु इथे मारेकरी आहेत! ते प्रतिक्षावरून बंगल्यावरून जाणार! टाटा प्रायव्हसी आणि नमस्कार सहकारी प्रवासी…असं त्यांनी ब्लॉगमध्ये खोचकपणे म्हटलं होतं. मात्र १७ सप्टेंबर २०१९ ला सकाळी अकराच्या सुमारास अमिताभ बच्चन यांना मोठा साक्षात्कार झाला आणि त्यांनी एक मेट्रो संबंधित ट्विट केल. त्या ट्विट नुसार, अब्जाधीश अमिताभ बच्चन यांचे मित्र देखील सार्वजनिक प्रवासाची साधनं वापरतात हे देशाला १७ सप्टेंबर रोजी समजलं. इतकंच नाही तर मेडिकल इमेजन्सीमध्ये असलेल्या मित्राने सर्व इमर्जन्सी विसरत, त्या अवस्थेत देखील अमिताभ बच्चन यांना मेट्रोचे प्रचंड फायदे सांगण्यासाठी संपर्क साधला, जेणेकरून ते मुंबईकरांसोबत तो अद्भुत अनुभव शेअर करू शकतील. आणि त्याप्रमाणे त्यांनी मित्राचे मेट्रोचे अनुभव शेअर केलं. अर्थात फडणवीसांनी १ सप्टेंबर रोजी शेअर केलेल्या मेट्रोच्या प्रोमोमध्ये मला लोकांनी पाहिलं याचा त्यांना विसर पडला. कारण सध्या केंद्राच्या आणि राज्यांच्या अनेक योजनांमध्ये ते ब्रँड अँबेसिडर आहेत. काय होतं ते ऐतिहासिक ट्विट ते खाली पाहा.

घटनाक्रम-४ (तारीख १७ सप्टेंबर २०१९)
#SaveAarey अभियानात चित्रपट श्रुष्टीतील अनेक कलाकारांनी भाग घेऊन देखील, त्यावर ट्विट न करणारं मुंबई मेट्रो-३ च अधिकृत ट्विटर हॅन्डल जागृत झालं. अमिताभ बच्चन यांनी सकाळी अकराच्या सुमारास मित्राचे मेट्रो संबंधित अद्भुत अनुभव ट्विट करताच, तोच व्हिडिओ मेट्रो-३ च अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून तासाभरात अश्विनी भिडे यांनी ट्विट केला आणि अमिताभ बच्चन यांचा मुंबई मेट्रो अभियानाला पाठींबा आणि #SaveAarey अभियानाला चपराक अशा बातम्या काही क्षणात सर्वत्र पसरल्या. अमिताभ यांच्या समर्थनाच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर पेरल्या गेल्या कारण मुंबई हायकोर्टातून तात्पुरता स्टे येणार हे प्रशासनाला माहित होतं, कारण ३० तारखेपर्यंत झाडं तोडली जाणार नाही असं लेखी लिहून देण्यात आलं आहे याची त्यांना कल्पना होती.

घटनाक्रम-५ (तारीख १७ सप्टेंबर २०१९)
त्याप्रमाणे, दुपारी मुंबई उच्च न्यायालयाचा आरेतील वृक्षतोडीवरून तात्पुरता स्टे आला. मात्र सत्ताधारी, प्रशासन, भाजप कार्यकर्ते आणि आरएसएस स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध गढूळ केलेलं पाणी शहरभर पसरलं होतं आणि त्याचाच आम्ही खुलासा मुंबईकरांना करून देत आहोत. काही आहे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या वृक्षतोडीच्या तात्पुरत्या स्टे संबंधित एएनआय’ने दिलेलं अधिकृत वृत्त.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x