15 January 2025 5:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका
x

अल्पवयीन असतानाच समीर वानखेडेंच्या नावावर बारचं परमीट | वडील उत्पादन शुल्क विभागात कामाला होते

Permit Bar license of Sameer Wankhede

मुंबई, 19 नोव्हेंबर | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडे अल्पवयीन असतानाच त्यांच्या वडिलांनी समीर यांच्या नावावर बारचं परमीट घेतलं होतं, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी (Permit Bar license of Sameer Wankhede) केला आहे.

Permit Bar license of Sameer Wankhede. Nawab Malik has made a serious allegation that his father had obtained a bar permit in Sameer Wankhede’s name when he was a minor :

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला आहे. ज्ञानदेव वानखेडे हे 1997मध्ये उत्पादन शुल्क कार्यालयात नोकरीला होते. त्यावेळी त्यांनी समीर वानखेडेंच्या नावावर बारचं परमीट काढलं होतं. त्याची नोंद ठाणे जिल्ह्याच्या रजिस्टरमध्ये नोंद आहे. समीर ज्ञानदेव वानखेडे या नावानं हे परमीट घेण्यात आलं. त्यावेळी समीर यांचं वय होतं. 17 वर्ष 10 महिने आणि 19 दिवस. बाप उत्पादन शुल्क विभागात काम करत होता. त्यामुळे त्यांनी एका अल्पवयीन मुलाला बारचं परमीट दिलं. हा सर्वात मोठा फर्जीवाडा आहे, असं मलिक म्हणाले. वानखेडे यांच्या नावावर वाशी येथे हा बार आहे. या बारचं परमीट नुतनीकरणही करण्यात आलं आहे. 31 मार्च 2022पर्यंत या बारचं परमीट नुतनीकरण करण्यात आलं आहे. हे बार आणि रेस्टॉरंट आहे.

समीर वानखेडेंनी काय म्हटले?
दरम्यान, भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्यापूर्वीच माझ्या नावावर बारचं परमीट घेण्यात आलं होतं. वडिलांनी मला पॉवर ऑफ अॅटर्नी दिली होती. त्यात काही बेकायदेशीर नव्हतं. तसेच आयकर भरताना मी माझ्या उत्पन्नाचे सर्व स्त्रोतही दाखवले आहेत, असं समीर वानखेडे यांनी टाईम्स ऑफ इंडियांशी बोलताना सांगितलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Permit Bar license of Sameer Wankhede allegations made by Nawab Malik.

हॅशटॅग्स

#NawabMalik(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x