23 February 2025 3:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

मुंबईत महिला असुरक्षित; नाईट नाईफ निर्णयावेळी सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते

Matunga Railway Station

मुंबई: माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांची छेडछाड काढत विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र महिलांनी कोणतीही तक्रार दाखल न केल्याने फक्त चोरीचा गुन्हा दाखल होत या विकृताची सुटका होण्याची शक्यता आहे. हा व्यक्ती रेल्वे स्थानकावर महिलांना स्पर्श करताना सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. इतकंच नाही तर तो हस्तमैथून देखील करत होता. दोन महिलांना पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. पण त्यांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला. रजिऊर खान असं या विकृताचं नाव आहे.

 

मुंबई सारख्या शहरातील रेल्वे स्थानकात अशा धक्कादायक घटना असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जाऊ लागलं आहे. माटुंगा स्थानकातील पुलावर एका विकृताने मुलीसोबत चुंबन घेऊन छेडछाड केली. हा किळसवाणा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना २६ जानेवारीला दुपारी घडली आहे. किंबहुना याला विकृत म्हणावा की शहाणा ते समजण्या पलीकडील आहे. कारण दिवसा असं केल्यास धुलाई होण्याची शक्यता असल्याने सदर व्यक्ती रात्री उशिरा म्हणजे जेव्हा रेल्वे स्थानकावर वर्दळ नसते आणि मुली किंवा महिलांनी आरडाओरडा केला तरी मदतीसाठी कोणीही नसेल याची सदर व्यक्ती काळजी घेत असल्याचं समजतं.

एका बाजूला मुंबईमध्ये २६ जानेवारीच्या दुसऱ्या दिवशी नाईट लाईफच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली आणि त्यावर विरोधकांनी आधीच सुरक्षेच्या कारणावरून प्रश्न सरकारला धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र मुंबई शहरातील लेकी अशाच उद्या सरकारच्या सुरक्षा विषयक नियोजनावर विश्वास ठेऊन रात्री एक-दोन जणी मिळून नाईट लाईफचा आनंद घ्यायला गेल्यास नेमकी काय परिस्थती उद्भवू शकते याचा अंदाज सरकारने या घटनेवरून घेऊन वेळीच सतर्क होणं गरजेचं आहे.

 

Web Title:  Pervert reaches lonely young woman Mumbai Matunga Railway bridge to kiss.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x