21 April 2025 3:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

मुंबई | PSI मोहन दगडे यांचं कोरोनामुळे निधन | आजपर्यंत १०१ कर्मचाऱ्यांचं निधन

Mumbai Police

मुंबई, १२ एप्रिल: कोरोनाच्या विस्फोटामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार हे जवळपास निश्चित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका घेत आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय काल रविवार 11 एप्रिलला झालेल्या टास्कफोर्सच्या बैठकीत कडक लॉकडाऊनवर चर्चा झाली. त्यामुळे महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊन लागणार हे निश्चित आहे. दुसरीकडे मागील सोमवारपासून कडक निर्बंध लागू केल्यापासून पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आला आहे.

दरम्यान, मुंबईत पोलीस अधिकाऱ्याचं कोरोनामुळे निधन झालं आहे. वाकोला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहन दगडे यांचं करोनामुळे निधन झालं आहे. ते ५४ वर्षांचे होते. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकोला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहन दगडे यांना करोनाची लागण झाली होती. त्यांनी बीकेसीमधील जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती खालवल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होते. मात्र पहाटे ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनामुळे आतापर्यंत १०१ कर्मचाऱ्यांच्या निधन झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

 

News English Summary: Maharashtra One police officer from Mumbai’s Vakola Police Station, aged 54, has died after testing positive for #COVID19. He was admitted at BKC jumbo Covid centre for treatment. 101 police personnel have died due to coronavirus so far said Mumbai Police.

News English Title: Police officer from Mumbai Vakola Police Station passes away due to covid 19 news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या