20 April 2025 10:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

इयत्ता १० वी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात 'भाजप-शिवसेना' ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य मंडळाच्या १० वी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमध्ये केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे गुणगान तर विरोधी पक्षांवर निशाणा साधण्याचा पद्धतशीर प्रयत्नं करण्यात आला आहे.

बदललेल्या अभ्यासक्रमानुसार बालभारतीने तयार केलेल्या पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. बालभारतीने तयार केलेल्या नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये शेअर बाजार, म्युच्युअल फंड्स, जीएसटी आणि अवयवदान या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमध्ये केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे गुणगान तर विरोधी पक्षांवर निशाणा साधण्याचा पद्धतशीर प्रयत्नं करण्यात आला आहे.

परंतु या पुस्तकांमधील आशयाबाबत विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. यंदापासून प्रथमच इयत्ता १० वी राज्यशास्त्र हा विषय इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. परंतु या पुस्तकामध्ये राजकीय सद्यस्थिती आणि पक्षांबाबतचे उल्लेख आल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

याच पुस्तकात ‘भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचा पक्ष असून प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन केले पाहिजे, अशी पक्षाची भूमिका आहे. शिवसेना हा राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. त्याची स्थापना मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक, मराठी भाषेचे संवर्धन व परप्रांतीयांना विरोध करण्यासाठी झाली आहे. शिवसेना १९९५मध्ये भारतीय जनता पक्षाशी युती करून सर्वप्रथम सत्तेत आला. त्यानंतर २०१४च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपसोबत सहभागी झाला. विशेष म्हणजे ही माहिती धनुष्यबाण या शिवसेनेच्या चिन्हासह भगव्या रंगात छापण्यात आली आहे.

हे सर्व पाहता बालभारतीने अभ्यासक्रमानुसार बनवलेला इयत्ता १० वी राज्यशास्त्र हा विषय सत्ताधाऱ्यांच्या प्रचारासाठी आहे की शिक्षणासाठी हाच प्रश्न उपस्थित झाला आहे. इतकंच नाही तर बालभारतीच्या व्यवस्थापनाला असा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी काही दबाव होता का असा प्रश्न सुद्धा तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. या सर्व प्रकाराबद्दल शिक्षक तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या