22 November 2024 2:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

कोरेगाव-भीमामधील हिंसाचार भडकविण्यात भाजपचे जवळचे लोक: गृहमंत्री

Koregaon Bhima violence, BJP Peoples, Home Minister Anil Deshmukh

मुंबई: कोरेगाव-भीमामधील हिंसाचार भडकविण्यात भारतीय जनता पक्षाच्या जवळचे लोक होते, असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. अशा लोकांचे पितळ उघडे पडेल या भीतीनेच एनआयएची चौकशी लावली असे देशमुख यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. या हिंसाचार प्रकरणी राज्य व केंद्र सरकारमध्ये गेले काही दिवस तणातणी सुरू आहे. देशमुख म्हणाले, या हिंसाचारामागील वास्तव समोर यावे म्हणून खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून चौकशीसाठी एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. त्यावर काही कार्यवाही होण्याआधी केंद्राने एनआयए चौकशीचे आदेश दिले. राज्य सरकारने एसआयटीमार्फत चौकशी केली असती तर या भाजपच्या विचारांविरुद्ध बोलणाऱ्यांची नावे हिंसाचार प्रकरणात गोवल्याचे उघड झाले असते.

तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भीमा-कोरेगाव प्रकरणी चौकशी आयोगासमोर उलट तपासणी करा, अशी मागणी कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय लाखे पाटील यांनी केली आहे. आपल्या विशेषाधिकाराचा वापर करुन देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला असा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत केलेल्या वक्तव्याची उलटतपासणी करण्यात यावी यासाठी त्यांना साक्षीदार म्हणून समन्स बजावण्यात यावे, अशी मागणी मी तपास आयोगाकडे केली आहे. फडणवीस यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर आरोप केले होते. मात्र, त्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्याविरोधात कारवाईसाठी कोणतेही पाऊल उचलले नाही, असं लाखे पाटील यांनी सांगितलं.

त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावावं, त्यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्याची उलटतपासणी घ्यावी, मागील भाजपा सरकारने या प्रकरणात अर्बन नक्षलचा मुद्दा आणला पण खऱ्या आरोपींची चौकशी केली नाही. चौकशी आयोगाने या घटनेतील सर्व कॉल रेकॉर्ड, पोलीस कंट्रोल रुमचे कॉल्स, वायरलेसचे कॉल याबाबत सर्व तपासणी करावी असं संजय लाखे पाटील यांनी मागणी केली आहे.

माजी मुख्यमंत्र्यांचं निवेदन म्हणजे हिंदूत्त्ववादी नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारं आहे. हिंसाचारात भगवे झेंडे फडकावणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांचं स्थानिक पोलिसांनी संरक्षण केलं, यावरही त्यांनी भाष्य केलं नाही. फडणवीस यांचं निवेदन आणि पोलिसांच्या तपासात विसंगती असल्याने त्यांना चौकशीसाठी बोलवणं गरजेचं आहे, असा डॉ. संजय लाखे पाटील यांनी याचिकेत म्हटलं आहे.

 

Web Title:  Pune Koregaon Bhima violence accuses peoples are related to BJP Party says Home Minister Anil Deshmukh.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x