29 January 2025 4:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | 500 रुपयांची SIP केल्यानंतर 5, 10, 20, 25 आणि 30 वर्षांमध्ये किती परतावा मिळणार, रक्कम जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपया 88 पैशाचा पेनी स्टॉक श्रीमंत करणार, कंपनीच्या नफ्यात 10,000 टक्क्यांनी वाढ, खरेदीला गर्दी - BOM: 542724 IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC Trident Share Price | 28 रुपयांच्या ट्रायडेंट शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअर 1 वर्षात 35 टक्क्यांनी घसरला - NSE: TRIDENT BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL Salary Account | तुमचे सॅलरी अकाउंट आहे का, अनेकांना सॅलरी अकाउंटविषयी 'या' महत्त्वाच्या गोष्टी ठाऊक नाहीत Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा 'पॉवर' शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER
x

बाळासाहेबांचा ठाकरे ब्रँड सांभाळण्यास राज ठाकरे समर्थ | संदीप देशपांडेची वयक्तिक प्रतिक्रिया

Raj Thackeray, Balasaheb Thackeray, Thackeray brand, Marathi News ABP Maza

मुंबई, १३ सप्टेंबर : अभिनेत्री कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन बराच वादंग माजला. सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध केला. एवढंच नाही तर राजकीय वर्तुळातही कंगनावर टीका झाली. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात कंगनाविरोधात हक्कभंगही आणला गेला.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हा संघर्ष सुरु आहे. मी मुंबई येतेय, कोणाच्या बापाची हिंमत असेल तर अडवून दाखवाव असं थेट चॅलेंज कंगनानं शिवसेनेला दिलं. त्यावर मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच आहे असं उत्तर शिवसेनेने दिलं. कंगनाच्या बेकायदेशीर कार्यालयावर हातोडा मारणे असेल किंवा कंगनानं मुंबईबद्दल केलेले विधान असेल या सर्व घडामोडीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मौन बाळगलं. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोक भाष्य केले आहे.

संजय राऊत म्हणाले की, ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा एकदा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ब्रँडचे एक घटक आहेत. या वादाचा फटका त्यांनाही बसणार आहे, शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल. त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल असं मत त्यांनी मांडले आहे.

दरम्यान संजय राऊत यांच्या विधानावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उत्तर दिलं आहे. मनसेची अधिकृत भूमिका राज ठाकरे मांडतील, पण ज्यावेळी २००८ मध्ये परप्रांतीयांच्या विरोधात मनसे लढा देत होती तेव्हा राजसाहेबांच्या बाजूने बोलायला शिवसेना खासदार संसदेत गप्प होती. पाकिस्तानी कलाकारांना हटवण्यासाठी मनसे आंदोलन करत होती तेव्हा शिवसेना गप्प होती. रातोरात मनसेचे ६ नगरसेवक चोरले तेव्हा शिवसेनेने डाव साधला. २०१४-२०१७ मध्ये बाहेरच्या लोकांविरोधात लढण्यासाठी राज ठाकरेंनी साद घातली तेव्हा शिवसेना गप्प होती अशी आठवण मनसेने शिवसेनेला करुन दिली आहे.

 

News English Summary: MNS general secretary Sandeep Deshpande has replied to Sanjay Raut’s statement. Raj Thackeray will play the official role of MNS, but when MNS was fighting against foreigners in 2008, Shiv Sena MPs were silent in Parliament to speak on behalf of Rajsaheb.

News English Title: Raj Thackeray able to handle Balasaheb Thackeray brand MNS Reply to Shiv Sena Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x