23 January 2025 6:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा Salary Vs Saving Account | सॅलरी आणि बचत खात्यात नेमका फरक काय, व्याजदर आणि मिनिमम बॅलेन्सचे नियम लक्षात ठेवा Penny Stocks | श्रीमंत करणार हा 1 रुपयाचा पेनी शेअर, 5 दिवसात 22% कमाई, यापूर्वी 857% परतावा दिला - BOM: 511012
x

राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीचा सेनेवर काहीही परिणाम होणार नाही: कृषीमंत्री दादा भुसे

Raj Thackeray, Devendra Fadnavis, Minister Dada Bhuse

मुंबई : २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी राज ठाकरेंनी मनसेच्या महाअधिवेशानचे आयोजन केलं आहे. राजकीय वर्तुळामधील चर्चेनुसार त्याचवेळी मनसेची नवीन भूमिका राज स्पष्ट करणार असल्याचे समजते. इतकच नाही तर मनसेचा झेंडा बदलण्याची घोषणाही या महाअधिवेशनात होण्याची शक्यता आहे. मनसेचा सध्याच्या झेंड्यामध्ये निळा, पांढरा, भगवा आणि हिरवा रंग आहे. मात्र आता हा झेंडा बदलून तो पूर्णपणे भगवा किंवा केशरी केला जाणार आहे. यासंदर्भात पक्षातील नेत्यांबरोबर चर्चा झाल्याचे समजते.

दुसरीकडे, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडविणारी बातमी पुढे आलीय. गेल्या काही वर्षांपासून भाजपवर तुटून पडणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आता नवी भूमिका घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती पुढे आलीय. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुढच्या वाटचालीत ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जातेय. मुंबईत या दोनही नेत्यांमध्ये दीड तास खलबतं झाली असून त्यात नव्या राजकारणाबद्दल चर्चा झाल्याची माहिती पुढे येतेय. त्यामुळे यापुढच्या काळात भाजप आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता आहे.

मात्र शिवसेनेचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नसल्याची प्रतिक्रिया दिली. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने आता मनसेसाठी आपला राजकीय अवकाश मिळवण्याचं आव्हान आहे. म्हणूनच भाजपच्या मदतीने आपली जागा मिळवण्याच्या पर्यायावर मनसे विचार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या भेटीबाबत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरेंशी भेट ही राजकीय नाही तर सदिच्छा भेट होती पण भविष्यात काहीही घडू शकतं. राज्यातील बदलेली सत्तासमीकरणं पाहता कालपर्यंत शिवसेना काँग्रेससोबत जाईल का असं कोणी म्हटलं तर वेडं म्हटलं असतं. पण शेवटी ते एकत्र झालेच. त्यामुळे महाराष्ट्र धर्माचा जो मूळ विचार आहे त्यावर चर्चा झाली आहे आणि भविष्यात काहीही होऊ शकतं असे संकेत मुनगंटीवारांनी दिले आहेत.

 

Web Title:  Raj Thackeray and Devendra Fadnavis meet will not impact Shivsena says Agriculture Minister Dada Bhuse.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x