5 November 2024 9:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News Shahrukh Khan | किंग खानने 50 सिगरेटचा 'तो' किस्सा सांगितलंनंतर चाहते किंचाळू लागले; पहा स्मोकिंगविषयी काय म्हणाला शाहरुख Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015
x

अवास्तव वीज बील आकारणीवरून राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, अन्यथा वीज कंपन्यांना झटका देणार

Raj Thackeray, CM Uddhav Thackeray, Electricity Bills, Adani Electricity

मुंबई, २८ जुलै : राज्यात काही दिवसांपासून वीजबिलांचा मुद्दा प्रकर्षानं समोर येताना दिसतोय. मुंबईसह राज्यभरातून याविषयी ओरड होत असून, याच मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भडकले आहेत. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्र दिलं आहे. “राज्य सरकारनं महावितरण आणि बेस्ट सारख्या सरकारी आस्थापनांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज द्यायला हवी, अन्यथा या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल,” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

लॉकडाऊनच्या काळात सरकारी आणि खासगी वीज कंपन्यांनी ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिलं पाठवली आहेत. राज ठाकरेंनी याच संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. वीज कंपन्यांनी पाठवलेली बिलं म्हणजे ग्राहकांची लूट आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाहाची शाश्वती नसताना वाढीव वीज बिल पाठवणं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावरच प्रहार करण्यासारखं असल्याचं राज यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

तत्पूर्वी, वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी मीटरचे रिडींग न घेता ग्राहकांना आवाजवी बिलं आकारले. त्यामुळे राज्यभरात याबाबत नाराजीचे सूर उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडाळाने 2 जुलैला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी मंत्र्यांना वीज बील कमी करण्याबाबत पत्र दिलं होतं. यावेळी ऊर्जामंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिली होती, मात्र त्यानंतर सरकारच्या बाजूने कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत.

 

News English Summary: The issue of electricity bills has been coming to the fore in the state for the last few days. Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray is outraged over this issue. Raj Thackeray has given a letter to Chief Minister Uddhav Thackeray in this regard.

News English Title:  Raj Thackeray Writes To Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray About Electricity Bills News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x