16 April 2025 11:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

टाटा समूहाकडून मुंबई पालिकेला १० कोटी, १०० व्हेंटिलेटर्स आणि २० अँब्युलन्सची मदत

Ratan Tata group, donates, Covid plasma therapy, Ventilators, Ambulance

मुंबई, 6 जुलै : उद्योगपती रतन टाटा नेहमीच समाजोपयोगी कामात पुढे असतात. पुन्हा एकदा Covid संकटात महाराष्ट्राच्या मदतीला ते धावून आले आहेत. राज्याच्या प्लाझ्मा प्रकल्पासाठी मदत म्हणून 10 कोटी रुपयांचं साहाय्य टाटा उद्योगसमूहाकडून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिकेला सुपूर्द केलं. याशिवाय 100 व्हेंटिलेटर्स आणि 20 अँब्युलन्सही टाटा समूहाकडून देण्यात आल्या आहेत.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई मनपा आणि टाटा समुह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समुहातर्फे महापालिकेला वीस रुग्णवाहिका, १०० व्हेंटिलेटर्स आणि दहा कोटींचे अर्थ सहाय्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर आदी यावेळी उपस्थित होते.

याअगोदरही Coronavirus च्या उद्रेकाच्या पहिल्या टप्प्यातच टाटा उद्योग समूहाकडून भरभक्कम मदत देण्यात आली होती. उद्योगपती रतन टाटा यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदतीचा हात पुढे केला आणि तब्बल 500 कोटींची मदत देणार असल्याचं त्यांनी मार्चमध्येच जाहीर केलं होतं. देश आणि जगासमोरचं संकट हे अतिशय मोठं आहे. त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. ती काळाची गरज आहे. मानवते समोरचं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे असंही रतन टाटांनी म्हणाले.

टाटा समुह सुरूवातीपासूनच राज्य शासनाच्या सोबत पूर्ण ताकदीने उभा राहीला आहे. कोरोनाचे संकट संपविण्याच्या जिद्दीने आपण सर्वच उतरलो आहोत. शासनासोबत नागरीक आणि मोठे उद्योजक खांद्याला खांदा लावून लढत आहेत. सर्वच जण अविश्रांत मेहनत करीत आहेत. त्यात यश आल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

News English Summary: Industrialist Ratan Tata is always at the forefront of social work. Once again, they have come to the aid of Maharashtra in the Covid crisis. In the presence of the Chief Minister, a grant of Rs. 10 crore from the Tata Group of Companies was handed over to the Mumbai Municipal Corporation as assistance for the state’s plasma project.

News English Title: Ratan Tata group donates 10 crore to Maharashtra government for Covid plasma therapy Maharashtra News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ratan Tata(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या