17 April 2025 1:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

मंदिर-मशिदीच्या निर्माणावर पैसे खर्च करण्यापेक्षा आरोग्य यंत्रणा सुधारण्याची गरज | किशोरी पेडणेकर

Mandirs Masjids, Focus On Health Infra, Kishori Pednekar

मुंबई, १७ ऑगस्ट : सध्या जगभरावर कोरोनाचं संकट आहे, मुंबईतही कोरोना महामारी आहे. या संकटातून सगळ्यांना एक धडा मिळाला आहे. मंदिर , मशिदी, चर्च, गुरुद्वारा यांच्या निर्माणासाठी जे पैसे खर्च केले जातात त्यापेक्षा आपल्याला आरोग्य यंत्रणा सुधारणा करण्याकडे लक्ष द्यायला हवं असं मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मांडले आहे.

महापालिका आणि आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे गेल्या ४ महिन्यांत करोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. मुंबई महापालिकेची आरोग्य या महामारीचा कसा सामना करत आहे याबद्दल इंडियन एक्सप्रेसने महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संवाद साधला. इंडियन एक्स्प्रेसशी साधलेल्या संवादात पेडणेकर यांनी करोना महामारीने, आपल्याला मंदिर-मशिदीच्या निर्माणावर पैसे खर्च करण्यापेक्षा आरोग्य यंत्रणा सक्षम करणं गरजेचं आहे हे शिकवलंय असं मत व्यक्त केलं.

धार्मिक स्थळ गरजेचे असले तरी सध्या त्यापेक्षाही अधिक हॉस्पिटलचं, नर्सिंग होम उभे करणे आवश्यक आहे. मुंबईतील २४ वार्डापैकी २० वार्डात रुग्णवाढीचा दर १ टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. मुंबईत ज्या पद्धतीने कोरोना रुग्णवाढीने उच्चांक गाठला होता. आता हळूहळू हा दर निच्चांक होत आहे. मुंबईकर सोशल डिस्टेंसिंगच पालन उत्तमरित्या करत आहेत. मुंबई महापालिकेने 4T कॅम्पेन (Tracing, Testing, Treatment, Tracking) याची अंमलबजावणी केली. त्यानंतर कोरोनाचं हॉटस्पॉट असलेल्या वरळी कोळीवाडा, धारावी येथे सकारात्मक बदल दिसले, सध्या आम्ही मृतांचा आकडा कमी करण्यावर भर देत असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

 

News English Summary: This pandemic has taught us a very important lesson. Rather than spending money on constructing mandirs, masjids, churches and gurdwaras, we need to focus on health infrastructure like constructing hospitals and nursing homes says Mumbai Mayor Kishori Pednekar. Religious places are important but now health should be given more importance.

News English Title: Rather Than Spending Money On Constructing Mandirs Masjids We Need To Focus On Health Infra Says Kishori Pednekar News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiMayor(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या