5 November 2024 6:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

'थँक्यू गोडसे, नोटांवरून गांधींचा फोटो हटवा' महिला IAS अधिकाऱ्याचं धक्कादायक ट्वीट

Narendra Modi, RSS

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्यामुळे एक महिला आयएएस अधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. निधी चौधरी असं या महिला अधिकाऱ्याचं नाव असून त्यांनी १७ मे रोजी महात्मा गांधीविषयी अत्यंत खबळजनक आणि वादग्रस्त ट्वीट केलं होतं. पण नंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानं त्यानं आपलं ट्वीट डिलिट केलं, परंतु तोपर्यंत या ट्वीटचे स्क्रिनशॉट सर्वत्र व्हायरल झाले होते. त्यामुळे आता महिला आयएएस अधिकारी निधी चौधरी यांच्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी एनसीपीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

महात्मा गांधींविषयी ट्वीट करताना निधी यांनी महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे यांना धन्यवाद दिले. त्यांनी लिहीलं, “महात्मा गांधी यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र आता वेळ आली आहे. ज्या रस्ते, संस्थांना गांधीचे नाव दिले आहे, ते काढण्यात यावे, जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत तसेच नोटेवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा. हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ३०-१-१९४८ साठी थँक्यू गोडसे.”

निधी चौधरी यांच्या या आक्षेपार्ह ट्वीटमुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली. त्यानंतर त्यांनी आपलं ट्वीट डिलिट केलं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी गांधींजींच्या पुतळ्यासोबतचे फोटो ट्विटरवर शेअर करत, लोकांनी माझ्या ट्वीटचा विपर्यास केला त्यामुळे मी माझं ट्वीट डिलिट केल्याचं स्पष्टीकरण दिलं. महात्मा गांधींचा अपमान करण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता असंही त्यांनी आपल्या आत्ताच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. निधी चौधरी या आयएएस २०१२ बॅचच्या असून सध्या मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त (विशेष) आहेत. याआधी त्या मुंबई महानगरपालिकेच्याच सहाय्यक कलेक्टर होत्या.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x