22 April 2025 4:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

संबित पात्रांचं ते वक्तव्य | आणि अर्णब यांच्या कालच्या घोषणांचा अचूक ताळमेळ - सविस्तर वृत्त

Republic TV, local news channels, Sambit Patra, Arnab Goswami

मुंबई, १२ नोव्हेंबर: वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींना देखील न्यायालयाने जामीन मजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येकी पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले.

मात्र तुरूंगातून सुटका झाल्यावर अर्णब गोस्वामी पुन्हा आक्रमक झाला आहे. “उद्धव ठाकरे तुम्ही मला जुन्या प्रकरणात अटक केली आणि माझी माफीही मागितली नाही. खेळ तर आता सुरू झाला आहे,” असंही अर्णब गोस्वामी यावेळी म्हणाले. तसंच आता प्रत्येक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. तसंच आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही आपली उपस्थिती असल्याचं ते म्हणाले. “मी तुरूंगाच्या आतूनही वाहिनी सुरू करेन आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही,” असंही त्यांनी आक्रमक होत म्हटलं.

तत्पूर्वी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खात्रीने केलेल्या वक्तव्यांचा आणि अर्णब गोस्वामींनी तुरुंगातून बाहेर पडल्यावर केलेल्या घोषणांचा अचूक ताळमेळ लागला आहे. जणू रिपब्लिकच्या टीव्हीचेच ते प्रवक्ते होते आणि त्यामुळे सरकार दरबारी रिपब्लिकच्या कोणत्या योजना अचानक मान्यतेसाठी गेल्या आहेत याची त्यांना कल्पना असावी.

संबित पात्रा म्हणाले होते की Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Republic TV Editor Arnab Goswami) हे तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर आपल्याला पूर्णपणे वेगळ्या स्वरुपात पाहायला मिळतील असा ठाम विश्वास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा (BJP National Spokeperson Sambit Patra) यांनी व्यक्त केला होता. तसेच ते प्रसारमाध्यमांचे चेहरामोहरा बदलून टाकतील असं मत देखील संबित पात्रा यांनी व्यक्त केलं. चेहरा मोहरा मागे एक मोठं राजकरण शिजतंय याचा सुगावा जर विरोधकांना लागला नाही तर त्यांना २०२४ मध्ये त्याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल अशी शक्यता नाकारता येतं नाही. मात्र यात त्यांच्या निशाण्यावर केवळ विरोधक नसून इतर प्रसार माध्यमं देखील असतील, ज्यांना आर्थिक स्पर्धेतून टाळं ठोकण्याची वेळ आणली जाईल. भविष्यात केंद्र सरकारच्या जाहिरातींचा मोठा भाग कोणत्या वृत्त वाहिन्याकडे वर्ग केला जाणार याची वेगळी मांडायला नको. तर खाजगी जाहिरातींचा पैसा कसा स्वतःकडे खेचायचा याचे मोठे तंत्र त्यांना आधीच अवगत झालं आहे.

 

News English Summary: BJP national spokesperson Sambit Patra’s convincing statement at a press conference two days ago and Arnab Goswami’s announcement after his release from jail are in perfect balance. It was as if he was the spokesman for Republic TV, and so he must have had an idea of what plans the government had suddenly gone to for approval.

News English Title: Republic TV local news channels and Sambit Patra statement news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या