15 January 2025 11:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
x

अर्णब गोस्वामी प्रकरण | आ. प्रताप सरनाईकांची होती मोठी भूमिका - सविस्तर वृत्त

Shivsena MLA Pratap Sarnaik, Arnab Goswami case

ठाणे, २४ नोव्हेंबर: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केलं. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने कारवाई सुरु केली. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप ईडीकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरीही ईडीने छापे मारले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या कारवाईचं भाजपनं समर्थन केलं आहे.

या धाडसत्रावरून अनेक राजकीय तर्क देखील लढविण्यात येत आहेत. रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला होता. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला होता आणि त्याला मंजुरी देण्याची मागणी सरनाईक यांनी केली होती.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबाबत अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीने सातत्याने वृत्तांकन केले होते. मात्र यादरम्यान, अर्णव गोस्वामी यांनी महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधात सातत्याने टीका केली होती. तसेच अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना आव्हान देण्याची भाषा केली होती.

प्रताप सरनाईक यांच्या या प्रस्तावानंतर विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला होता. या प्रस्तावानंतर भाजपानं गदारोळ घातला होता. दरम्यान, राज्य सरकार आणि जनतेचा अवमान असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं. “अर्णब गोस्वामी हेतुपुरस्सर बोलत आहेत. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाशी नेत्यांचा काहीही संबंध नाही. ते कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. रिपब्लिक टीव्ही ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी,” अशी मागणी सरनाईक यांनी प्रस्ताव मांडताना केली होती.

 

News English Summary: Along with Shiv Sena MLA Pratap Saranaik, ED is conducting raids at 10 other places in Mumbai. It is learned that this action is being taken in the money laundering case. The ED has also raided the house of Shiv Sena MLA Pratap Saranaik in Thane. So there is only one sensation. The BJP has supported the action taken by the ED against Saranaik’s home and office.

News English Title: Role of shivsena MLA Pratap Sarnaik in Arnab Goswami case news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x