16 April 2025 6:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
x

शिवसेना सोबत आली नाही तर, राष्ट्रवादीनं युतीसाठी एकत्र यावं - आठवले

RPI President Ramdas Athavle, NCP, NDA alliance, Sharad Pawar

मुंबई, २८ सप्टेंबर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात नेमकी भेट का झाली, याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही, असं स्पष्ट करत रिपाईच्या रामदास आठवले यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा महायुतीत येण्याचं आवाहन केलं आहे. कोणी एकत्र यायचं असेल तर, शिवसेनेला प्राधान्य आहे. शिवसेनेनं भाजप- रिपाईसोबत यावं असं वक्तव्य त्यांनी मुंबईत पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत केलं.

इतक्यावरच न थांबता आठवले यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, शरद पवार यांच्यापुढंही युतीचा प्रस्ताव ठेवला. शिवसेना जर सोबत आली नाही तर, राष्ट्रवादीनं युतीसाठी एकत्र यावं असं म्हणत विकासासाठी खुद्द पवार यांनीच निर्णय घ्यावा असं ते म्हणाले. राजकीय वर्तुळातील आरोप- प्रत्यारोप आणि भूमिका पाहता आमची दोस्ती अशी आहे की त्यांना तिकडे आणि मला इकडे करमत नाही, तर पवारांनीच इथं यावं.

काही दिवसांपूर्वी रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करुन शरद पवारांना काँग्रेसचं अध्यक्ष करावं असंही विधान केलं होतं. दरम्यान, राऊत-फडणवीस भेटीनंतर राज्यांत चर्चांना उधाण आलं असलं तरीही महाविकास आघाडी सरकार हे त्यांच्यातील विरोधामुळेच पडेल, आम्हाला यासाठी काहीही करावं लागणार नाही अशी भूमिका भाजपा नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे याप्रकरणी भविष्यात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis and Shiv Sena leader Sanjay Raut did not know exactly why the meeting took place. If anyone wants to come together, Shiv Sena has priority. He said that Shiv Sena should come with BJP-Ripai in a press conference held in Mumbai.

News English Title: RPI President Ramdas Athavle on NCP NDA alliance Sharad Pawar and Shivsena BJP politics Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या