23 February 2025 2:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आम्ही जिंकणार | शिवसेनेचा पराभव होणार - आठवले

RPI President Ramdas Athawale, Shivsena, BMC Election

मुंबई, २९ डिसेंबर: रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांच्या युपीए अध्यक्षपदावरुन भाष्य केले आहे. युपीएचं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात यावं, अशी मागणी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली होती. मात्र, शिवसेना युपीएचा घटक नाही. शिवसेनेच्या या मागणीमुळे ठाकरे सरकारसोबत काँग्रेसचा खळ्ळखट्यॅक होणार आहे.काँग्रेस सरकारमधील आपला पाठिंबा काढणार आणि हे सरकार पडणार आहे, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. (RPI President Ramdas Athawale target Shivsena over upcoming BMC Election)

तसेच आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही जिंकणार आणि शिवसेनेचा पराभव होईल, असा दावा त्यांनी केला आहे. भाजपने देखील याच विषयाला नुसरून महाविकास आघाडीतील काँग्रेसला लक्ष केलं आहे. या संदर्भात आमदार आशिष शेलार म्हणाले की काँग्रेस नेते म्हणतात, श्रेष्टींनी ठरवलं तर आम्ही महापौर बसवू, क्रॉफर्ड मार्केटमध्ये एखादा आयटम विकत घ्यावा, असं काही निवडणुकीतील पद आहे का? इतक्या सहजपणे मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकता येत नाही, असं आशिष शेलार म्हणाले.

काँग्रेसने आत्मपरिक्षण करावं. आधी आपल्याकडे लोक आहेत का, कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत का, काही मतदार शिल्लक राहिले आहेत का? याचा विचार करावा. बरं हे आम्ही म्हणत नाही तर तुमच्यासोबत जे सत्तेत बसले आहेत ती शिवसेना म्हणत आहे. तुमच्यासोबत मतदार राहिले नाही. तुमचे नेते राहुल गांधी आता बिनकामाचे झाले ही शिवसेनाच म्हणते, असा टोला शेलारांनी लगावला. महापौराच्या गप्पा मारणे खूप मोठी गोष्ट आहे. महापालिकेत आज विरोधीनेतेपद शिवसेनेच्या जीवावर मिळालं आहे. त्यामुळे त्यांनी आधी आत्मपरीक्षण करावं, असा चिमटा त्यांनी काढला.

 

News English Summary: Its national president and Union Minister Ramdas Athavale has commented on Sharad Pawar’s UPA presidency. Shiv Sena leader Sanjay Raut had demanded that the UPA presidency should be given to NCP president Sharad Pawar. However, Shiv Sena is not a component of UPA. Due to this demand of Shiv Sena, the Congress will have a quarrel with the Thackeray government. The Congress will withdraw its support from the government and this government will fall, claimed Ramdas Athavale. He also claimed that we will win the upcoming Mumbai Municipal Corporation elections and Shiv Sena will lose.

News English Title: RPI President Ramdas Athawale target Shivsena over upcoming BMC Election news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x