20 April 2025 7:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण

Security guards, CM Uddhav Thackeray son, Tejas Thackeray, Covid19

मुंबई, २० जुलै : मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर आजतागायत तब्बल सव्वाचार लाखांहून अधिक मुंबईकरांची करोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी साधारण एक लाख मुंबईकरांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यापैकी ७० टक्के करोनाबाधित बरे झाले आहेत. मात्र आजघडीला नवी दिल्लीमध्ये सर्वाधिक चाचण्या करण्यात आल्या असून चाचण्यांच्या बाबतीत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्यांच्या इतर सुरक्षा रक्षकांचीही तपासणी करण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्र्यातील कलानगरस्थित असलेल्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करत 14 दिवसासाठी क्वॉरंटाईन केले होते. त्यात आता पुन्हा आणखी दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

तेजस ठाकरे यांना व्हाय प्लस सुरक्षा पुरवली जाते. त्यांच्या ताफ्यातील दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने इतर सुरक्षा रक्षकांचीही तपासणी करण्यात आली असून त्यांना तातडीने क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

 

News English Summary: It has become clear that two security guards of Chief Minister Uddhav Thackeray’s son Tejas Thackeray have contracted corona. So their other security guards will also be investigated.

News English Title: Security guards of CM Uddhav Thackeray son Tejas Thackeray have contracted corona News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या