19 April 2025 10:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे वृध्दपकाळाने निधन

Senior journalist Dinu Ranadive, passed away

मुंबई, १६ जून : ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे त्यांच्या दादर येथील निवासस्थानी आज सकाळी वृध्दपकाळाने निधन झाले. १६ मे रोजी दिनू रणदिवे यांच्या पत्नीचे निधन झाले होते. आणि एका महिन्याने आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

संयुक्त महाराष्ट्र पत्रिके’च्या माध्यमातून सुरु असलेल्या लोकचळवळीत त्यांचा महत्वाचा सहभाग राहीला. गोवा मुक्ती संग्रामातही त्यांचा सहभाग होता. सामान्य माणसांचे, वंचितांच्या प्रश्नांना त्यांनी नेहमीच वाचा फोडली. बांगलादेश युद्धाचे त्यांनी प्रत्यक्षात जाऊन वार्तांकन केलं होतं. भिवंडी आणि वरळी दंगलीचे भयानक सामाजिक वास्तव त्यांनी समाजापुढे मांडले.

दिनू रणदिवे यांचा जन्म १९२५ साली डहाणूतील आदिवासीबहुल भागात झाला. १९५६ सालापासून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत रणदिवे यांचा सक्रिय सहभाग होता. या आंदोलनात त्यांनी तुरुंगवास देखील भोगला होता. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्रासाठी रणदिवे यांनी मुख्य वार्ताहर म्हणून अनेक वर्ष काम देखील केलं होतं.

 

News English Summary: Senior journalist Dinu Ranadive passed away at his residence in Dadar this morning. Dinu Ranadive’s wife had passed away on May 16. And a month has passed since his death today.

News English Title: Senior journalist Dinu Ranadive passed away News Latest Updates.

 

 

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या