23 December 2024 2:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

आदित्य ठाकरेंची बदनामी करणाऱ्यांसोबत कशाला जायचे | राऊतांवर सेनेत नाराजी

Shivsena, MP Sanjay Raut, Devendra Fadnavis, Aaditya Thackeray

मुंबई, २८ सप्टेंबर : मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून शिरोमणी अकाली दलाने थेट राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. यावरुन शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर टीका केली आहे. ज्या कारणांसाठी एनडीए स्थापन झाली ते कारणच मोदींच्या झंझावातात नष्ट झाले हे सत्य स्वीकारुन नवा झेंडा फडकवावा लागेल. सध्या तरी अकाली दल हा एनडीएचा शेवटचा खांबही कलथून गेला आहे. राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्वाचे राजकारणही त्यामुळे निस्तेज होताना दिसत आहे, अशी टीका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

“महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार उत्तम चालले आहे. हे सरकार पाच वर्ष धावत राहील अशी स्थिती आहे. भविष्यात देशाच्या राजकारणात उलथापालथ घडविणारी आघाडी निर्माण होईल काय? याची चाचपणी सुरुच असते. पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेनेपाठोपाठ अकाली दलही बाहेर पडल्याने राष्ट्रीय राजकारण बेचव झाले आहे. काँग्रेस आजही मोठा पक्ष आहे. पण राष्ट्रीय पातळीवर निवडणुका जिंकल्याशिवाय राजकीय मोठेपण सिद्ध होत नाही. ज्या कारणांसाठी एनडीए स्थापन झाली ते कारणच मोदींच्या झंझावातात नष्ट झाले हे सत्य स्वीकारुन नवा झेंडा फडकवावा लागेल. सध्या तरी अकाली दल हा एनडीएचा शेवटचा खांबही कलथून गेला आहे. राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्वाचे राजकारणही त्यामुळे निस्तेज होताना दिसत आहे. नवा सूर्य उगवेल काय?” असा प्रश्नही शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

दुसरीकडे राऊत आणि फडणवीसांच्या भेटीनंतर शिवसेनेतच राऊतांवर संताप व्यक्त होताना दिसत आहे. ज्या आदित्य ठाकरे यांना भाजप नेत्यांनी अडचणीत आणले, त्यांच्याविषयी कारण नसताना बदनामी केली, शिवसेनेला अडचणीत आणले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरी बसून काम करतात, अशी टीका सतत केली; त्यांच्यासोबत सत्तेत जायचे कशाला, असा सूर शिवसेनेच्या नेत्यांनी लावला आहे. खा. संजय राऊत यांना या सगळ्या प्रश्नांची जाणीव नाही का, अशी टीकाही शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी केली आहे.

तसेच राजकीय दृष्टीने विचार केल्यास कोणाची तरी मते कमी झाल्याशिवाय दुसºयाचा फायदा नाही. अशा स्थितीत महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादीची मते शिवसेनेला कधीच मिळत नव्हती, ती जर मिळत असतील तर त्यात सेनेचा फायदा नाही का, असा सवालही सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे.

 

News English Summary: After the meeting between Raut and Fadnavis, it is seen that anger is being expressed against Raut in Shiv Sena itself. The BJP leaders who brought Aaditya Thackeray into trouble, slandered him for no reason, brought Shiv Sena into trouble, constantly criticized Chief Minister Uddhav Thackeray for working from home; Why go to power with them, is the tone set by Shiv Sena leaders. Eat. Some Shiv Sena ministers have also criticized Sanjay Raut for not being aware of all these issues.

News English Title: Senior Shivsena leaders not happy with MP Sanjay Raut meet with Devendra Fadnavis Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x