22 November 2024 1:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

पॅरोलवरील कुख्यात दहशतवादी 'डॉ. बॉम्ब' मुंबईतून फरार

Mumbai Bomb Blast, Serial Blast Convict Terrorist Doctor Bomb

मुंबई: १९९३ मधल्या मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी दहशतवादी जलीस अन्सारी गुरुवारी मुंबईतून गायब झाला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो २१ दिवसांच्या पॅरोलवर कुटुंबीयांशी भेटण्यासाठी तुरुंगाबाहेर आला होता. आग्रीपाडा पोलीस स्टेशनला तो बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र एटीएस आणि क्राइम ब्राँचनं हाय अलर्ट जारी केलं आहे. तसेच दहशतवादी जलीस अन्सारीला पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

अजमेर येथे १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात सीबीआयने मुंबईच्या आग्रीपाडा येथे राहणाऱ्या जालीस अन्सारी याला अटक केली होती. चौकशीमध्ये त्याचा देशभरात झालेल्या इतर अनेक बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग असल्याचे समोर आले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जालीस याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जालीस याला अजमेर येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. तुरुंगातूनच त्याने पॅरोलच्या सुट्टीसाठी अर्ज केला. या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने त्याला २१ दिवसांची सुट्टी मंजूर केली.

दरम्यान, मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना अशाप्रकारचा खतरनाक दहशतवादी बेपत्ता होणं, हा धोक्याचा इशारा समजला जात आहे. सर्व तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत. जलीस अन्सारीचे इंडियन मुजाहिद्दीन, सिमी यांच्यासह इतर दहशतवादी संघटनांसोबत घनिष्ठ संबंध आहेत. तो अनेक दहशतवादी संघटनांना बॉम्ब बनवण्याचे ट्रेनिंग द्यायचा. त्याला डॉ. बॉम्ब नावाने ओळखलं जातं. मालेगाव स्फोटातील तो प्रमुख आरोपी होता. देशभरातील जवळपास 50 बॉम्ब स्फोटात त्याचा हात असल्याचं सांगितलं जातं.

 

Web Title:  Serial blast convict Terrorist Doctor Bomb is missing from Mumbai.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x