23 February 2025 10:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

सरकार पाडून दाखवाच, नंतर आम्ही ऑपरेशन लोटांगण सुरू करतो

Shiv Sena leader Sanjay Raut, BJP, Operation Lotus

मुंबई, १२ जुलै : राज्यातील महाविकास आघाडी केव्हाही कोसळू शकते असं सतत विरोधी पक्षाकडून सांगण्यात येत असल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला आव्हान दिलं आहे. ते म्हणाले की, सरकार पाडणार… सरकार पाडणार हे रोज रोज कशाला बोलून दाखवता. आमचं चॅलेंज आहे, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच.’ ते पुढे म्हणाले की, तुमचं ऑपरेशन लोट्स असेल तर त्याविरोधात ऑपरेशन लोटांगण सुरू करून तुम्हाला राज्यातील जनतेसमोर लोटांगण घालायला लावू, असा इशाराही त्यांनी दिला.

संजय राऊत म्हणाले की, कोणताही मुहुर्त काढा, आमचं सरकार पाच वर्ष चालणार. काहींना जुगार खेळण्याचा छंद असतो, जुगार खेळत राहतात, हे मध्यप्रदेश नाही, महाराष्ट्र आहे, असं संजय राऊत यांनी सांगितले. तुमचं हे ऑपरेशन कमळ, लोट्स महाराष्ट्रात चालणार नाही. तुमचं ऑपरेशन लोट्स असेल तर आम्ही ऑपरेशन लोटांगण सुरू करून तुम्हाला धडा शिकवू, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की, रोज रोज सरकार पडणार सरकार पडणार काय सांगता? सरकार पाडायचं ना? मग पाडाच. हे माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे. तुमच्या राजकीय जीवनाचं ते जर उद्दिष्टंच असेल तर त्याला कोण काय करणार, असा टोला देखील संजय राऊतांनी लगावला आहे.

ते पुढे म्हणाले की, ‘एखाद्या राज्यात सरकार नाही म्हणून अस्वस्थ होण्याचं कारण काय? जेव्हा आपण सत्तेत असतो तेव्हा विरोधाचा सूरही असावा लागतो. विरोधक असेल तर सत्ता चालवण्यात मजा असते. पण सत्ता आणि पैशाचा माज असता कामा नये. त्यामुळे सरकार पाडण्याच्या भ्रमातून बाहेर पडा. प्रत्येकाच्या पायाखाली सतरंजी असते आणि कुणाला तरी ही सतरंजी खेचता येत असते, हे लक्षात ठेवा, असा इशारा देतानाच लोकशाही अस्थिर करू पाहणाऱ्यांना आता आणीबाणीवर बोलण्याचा आणि प्रवचन झोडण्याचा अधिकार राहिला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपकडून सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मध्यप्रदेशपाठोपठ राजस्थानमध्येही राजकीय भूकंपाची तयारी सुरू आहे. हे काही गोवा आणि मध्यप्रदेश नाही. तुमचं हे ऑपरेशन कमळ, लोट्स इथे चालणार नाही. तुम्हाला जनतेसमोर लोटांगण घालायला लावू. तुमचं ऑपरेशन लोट्स असेल तर आम्ही ऑपरेशन लोटांगण सुरू करून तुम्हाला धडा शिकवू. मग रोज सतत पाच वर्षे तुम्हाला मुहूर्तच काढावा लागेल, असं सांगतानाच रोज रोज सरकार पडणार सरकार पडणार काय सांगता? सरकार पाडायचं ना? मग पाडाच. हे माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे. तुमच्या राजकीय जीवनाचं ते जर उद्दिष्टंच असेल तर त्याला कोण काय करणार? असं राऊत म्हणाले.

 

News English Summary: Shiv Sena leader Sanjay Raut has challenged the BJP as the Opposition is constantly saying that the Mahavikas front in the state could collapse at any time. He said that the government will be overthrown, the government will be overthrown. Our challenge is, if you have the courage, bring down the government.

News English Title: Shiv Sena leader Sanjay Raut has criticized BJP’s politics News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x