22 January 2025 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

राजकारणापलीकडे नाते टिकून ठेवणाऱ्या राज ठाकरेंना राऊतांनी अशा दिल्या शुभेच्छा

MP Sanjay Raut, Raj Thackeray

मुंबई, १४ जून: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊतांनी ट्विट करून राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले..असे म्हणत संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे.

वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले.. असे व्यंगचित्रकार..रसिक मनाचे राजकारणी श्री. राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. जय महाराष्ट्र… असं ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. राजकीय व्यक्तींमध्ये विचारांनी मतमतांतर असू शकते. पण अनेकदा ही मंडळी मित्रत्वाचे नाते ठेवतात हे देखील समोर आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

व्यंगचित्र, राजकारणाबरोबर राज ठाकरेंना चित्रपट आणि फोटोग्राफी या क्षेत्राचीही विशेष आवड आहे. राज यांना चित्रपट पाहायला आवडतात. मराठी चित्रपट सृष्टीबरोबर बॉलिवूडमध्येही त्यांचे उत्तम संबंध आहे. राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हे सख्खे भाऊ. संगीत क्षेत्राची आवड असलेल्या श्रीकांत ठाकरे संगीतकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. मार्मिकच्या उभारणीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध होणाऱ्या राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा भाजपानेही धसका घेतला होता. म्हणूनच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर रेखाटलेल्या प्रत्येक व्यंगचित्राला भाजपा समर्थकही व्यंगचित्रातून उत्तर देत होते.

 

News English Summary: Shiv Sena MP Sanjay Raut has wished Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray a happy birthday. Sanjay Raut tweeted congratulations to Raj Thackeray. Sanjay Raut tweeted that the friendship lasted even during the storm.

News English Title: Shiv Sena MP Sanjay Raut has wished Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray a happy birthday News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x