मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्यास सरकारने नकार दिल्याने विनायक मेटेंचा संताप
मुंबई, २८ जुलै : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले असून, आता अधिवेशन ०७ सप्टेंबर २०२० रोजी बोलाविण्यात येईल, असा निर्णय आज विधान भवन मुंबई येथे झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपूर्वी राजभवनमधील २४ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेनं तातडीनं उपाययोजना राबवल्या आहेत. येत्या ३ ऑगस्टपासून सुरू होणार्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलले गेले आहे. तत्पूर्वी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून रोजी होणार होते. मात्र कोरोनामुळे ते पुढे ढकलून ३ ऑगस्ट रोजी घेण्याचे ठरले होते.
या सर्व बाबींवर उद्याच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन ७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ३ ऑगस्टपासून हे अधिवेशन घ्यायला सरकारही तयार नव्हते. आधीच सरकारमधील काही मंत्री, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. त्यात अधिवेशन घेऊन सरकार धोका पत्करू इच्छित नसल्याचंही सांगितलं जात आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या अंतरिम आदेशावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असतानाच राज्यातील विरोधक सरकारविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांनी आज जामकर सल्लागार समितीच्या बैठकीत मराठा आरक्षणासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली. मात्र मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याची गरज नाही, अशी भूमिका सरकारच्यावतीने मांडल्यामुळे विनायक मेटे यांनी बैठकीतून सभात्याग केला. कालच खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या विषयात राजकारण करु नये, असा सल्ला सरकारला दिला होता.
आजच्या जामकर सल्लागार समितीच्या बैठकीत मराठा आरक्षणावर दोन दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्याची मी मागणी केली मात्र मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि मंत्री अनिलजी परब यांनी अधिवेशन घेण्याची गरज नाही असे सांगितले.
— vinayak mete (@vinayakmete) July 28, 2020
News English Summary: Shiv Sangram Party MLA Vinayak Mete today demanded a two-day special session for Maratha reservation at a meeting of the Jamkar Advisory Committee. However, Vinayak Mete resigned from the meeting as there was no need to hold a special session for Maratha reservation.
News English Title: Shiv Sangram leader Vinayak Mete demands special assembly session for Maratha reservation News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या