22 December 2024 8:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

VIDEO | शिवसेना आ. दिलीप लांडेंनी कंत्राटदाराला रस्त्यात बसवून डोक्यावर कचरा टाकला

MLA Dilip Lande

मुंबई , १३ जून | मुंबईतील शिवसेना आमदाराच्या दादागिरीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या महामारीच्या परिस्थितीत चांदीवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडेंनी केलेले कृत्य अतिशय धक्कादायक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीव लांडेंनी एक कंत्राटदाराला पाण्याने भरलेल्या रस्त्यावर बसवले आणि डोक्यावर कचरा टाकला. इतकच नाही, तर या घटनेचा व्हिडिओ काढून व्हायरल केला.

या घटनेनंतर स्पष्टीकरण देताना लांडेंनी त्या कंत्राटदारावर आपले काम योग्यरित्या न केल्याचा आरोप लावला. तसेच, नाल्याची सफाई नीट न केल्यामुळेच रस्त्यावर पाणी साचल्याचे म्हणाले. मागील काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे मुंबईत रस्त्यांवर प्रचंड पाणी साचत आहे. पाणी साचल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पण, दिलीप लांडेनी जे कृत्य केले, ते योग्य नसल्याच्या प्रतिक्रीया येत आहेत.

 

News Title: Shivsena Chandivali MLA Dilip Lande threw garbage on BMC contractor video gone viral news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x