22 January 2025 10:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
x

VIDEO | दसरा मेळावा, मुंबईतील शिवतीर्थावर स्व. बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकांचा सागर उसळणार, शिवसेनेचा टीझर व्हायरल

Shivsena

Shivsena Uddhav Thackeray | मुंबई शिवाजीपार्क येथील शिवसेना दसरा मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याचाही शिवसेनेचा मानस आहे. यासाठी राज्याच्या विविध भागांमधून कार्यकर्ते आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खाजगी चार चाकी गाड्यांचे बुकिंग केले जात आहे. याशिवाय खाजगी बसेसचही हजारोंच्या संख्येने आरक्षण करण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे हे पक्ष वाढवण्यासाठी आणि नव्याने बांधणी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात काही पक्षप्रवेशही होणार असल्याची माहिती आहे. याशिवाय या सभेत उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर तुटून पडणार हे निश्चित आहे. शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळाव्यात याची झलक दिसून आली होती.

त्यासाठी नवा टीझर शिवसेनेने व्हायरल केला आहे. या टीझरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर फोकस ठेवण्यात आला असून जुन्या दसऱ्या मेळाव्याची क्षणचित्रेही यात दाखवण्यात आली आहेत. शिवसेनेचा हा टीझर 35 सेकंदाचा आहे. या टीझरच्या सुरुवातीलाच भगवे झेंडे आणि शिवसेनेच्या वाघाचे फोटो दाखवण्यात आले आहेत. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दाखवण्यात आला आहे. या शिवाय जुन्या दसऱ्या मेळाव्याची प्रचंड गर्दी या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena Chief Uddhav Thackeray Dasara Melava teaser Balasaheb Thackeray at Shivaji Park 30 September 2022.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x