24 January 2025 10:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी कमाईची मोठी संधी, प्राईस बँड सह डीटेल्स जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER
x

उद्धव ठाकरे यांनी वांद्रे येथे सह-कुटुंब मतदानाचा हक्क बजावला

Shivsena, Uddhav Thackeray, Maharashtra Vidhansabha Election 2019

मुंबई: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सुमारे ९ कोटी मतदार या निवडणुकीत उतरलेल्या ३,२३७ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत. महिनाभर सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीची शनिवारी सांयकाळी सांगता झाली. गेल्या ४८ तासांत वैयक्तिक भेटी-गाठी व इतर संपर्क साधनांच्या माध्यमांतून मतांची बेगमी करण्यावर उमेदवारांनी भर दिला. काही ठिकाणी पैसेवाटपावरून उमेदवारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडले.

दरम्यान, प्रचारात जनशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून सुरु झालेल्या शिवसेनेच्या प्रचाराला ग्रामीण भागात राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. आज काही वेळेपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी वांद्रे येथे सह-कुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x