23 February 2025 1:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

५ वर्ष सेनेचाच मुख्यमंत्री; शरद पवारांसोबत उद्धव ठाकरेंची निर्णायक चर्चा

NCP President Sharad Pawar, Shivsena Chief Uddhav Thackeray

नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीचे निकल जाहीर होऊन जवळपास महिना पूर्ण होत आला असला तरी सरकार स्थापनेच्या हालचाली सुरूच असून त्या अंतिम आणि निर्णायक टप्यात आल्या आहेत. दरम्यान, महिन्याभराच्या राजकीय अनिश्चिततेनंतर शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेस यांच्यात सहमती झाल्यामुळे महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होण्याचा मार्ग आता प्रशस्त झाला आहे. आज, शुक्रवारी मुंबईत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अहमद पटेल यांच्या (Uddhav Thackeray and Sharad Pawar) उपस्थितीत होणाऱ्या निर्णायक बैठकीत याविषयी औपचारिक घोषणा होणार आहे.

विशेष म्हणजे, पूर्ण वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री असतील, असा ‘फॉर्म्युला’ ठरल्याचेही प्रसारा माध्यमांच्या सूत्रांनी सांगितले. तिन्ही पक्षांच्या पाठिंब्याची पत्रे घेऊन उद्या, शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता आहे.

एनसीपी’चे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात गुरूवारी रात्री उशीरा बैठक झाली. यामध्ये ‘महाविकासआघाडी’ बाबात निर्णय जवळपास निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे. आज होणाऱ्या नियोजित बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Yuva Sena Chief Aaditya Thackeray and Shivsena MP Sanjay Raut) हे देखील उपस्थित होते.

दिल्लीतच या भेटीची तयारी झाली होती. तसा निरोपही मातोश्रीवर (Matoshri) देण्यात आला होता. दिल्लीत दोन दिवस झालेल्या विविध बैठकांमध्ये काय ठरले याची माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आली. आज सकाळी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या आमदारांना भेटणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या ३ पक्षांची उद्याची बैठक ही औपचारिक बैठक ठरावी आणि सगळ्या गोष्टी आधीच ठरवून घ्याव्यात या दृष्टीने गेले २ दिवस दिल्लीत काँग्रेस आणि एनसीपी’ने बैठका घेतल्या. त्यापाठोपाठ मुंबईत परत येताच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही त्या बैठकीतील चर्चेची माहिती देण्यात आली. त्यामुळे उद्याची बैठक ही केवळ औपचारिकता असेल, असे एनसीपी’च्या एका नेत्याने स्पष्ट केले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x