Shivsena Dasara Melava | शिवसेनेच्या राजकारणात भाषण गाजवणारा नेता अशी एकनाथ शिंदेंची ओळख कधीच नव्हती, तर लोकं चॅनल बदलतील

Shivsena Dasara Melava | मुंबई शिवतिर्थावर आणि मुंबई बीकेसीत एकाच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे भाषण सुरु झाले तर आपण कुणाचे भाषण ऐकणार? असे पोल घेण्याचा सपाटा सध्या अनेक वृत्तवाहिन्यांचा अधिकृत युट्युब चॅन्सलवर विचारला जातोय, जेथे लाखो-करोडोत फॉलोअर्स आहेत. त्यात जवळपास सर्वच चॅनेल्सवर ९२-९५ टक्के लोक उद्धव ठाकरे यांना पसंती देत आहेत. बरं, या वाहिन्यांवर भाजप, शिवसेना, मनसे, भाजप आणि शिंदे समर्थक देखील फॉलो करतात तरी त्यात शिंदेंच्या भाषणाला ७-८ टक्के पसंती मिळत आहे हे विशेष म्हणावे लागेल. त्यातही जर बीकेसीला सणासुदीच्या दिवशी आर्थिक आमिष दाखवून घरून ओढून-ताणून आणलेल्या लोकांनी खुर्चीत बसून मोबाईलवर शिवाजी पार्कचं भाषण ऐकलं नाही तर नवल वाटायला नको. कारण शिंदेंच्या रटाळ भाषण शैलीमुळे लोकं कसे निघून जातात याचा प्रत्यय जळगावात कॅमेऱ्यात कैद झाला होता. मात्र विषय तेवढ्यापुरतीच मर्यादित आहे का?
शिवसेनेत भाषण गाजवणारा नेता अशी एकनाथ शिंदेंची ओळखच नव्हती :
वास्तविक, शिवसेनेच्या इतिहासात भाषण गाजवणारा नेता अशी एकनाथ शिंदेंची ओळखच कधीच नव्हती. केवळ निवडणुकीत विशेष करून ठाणे जिल्ह्यात राजकीय लॉबिंग करणारा नेता अशी त्यांची कायम ओळख होती आणि मातोश्रीने गरजेपेक्षा मोठे अधिकार दिल्याने आणि मातोश्रीवर थेट प्रवेश हवा असल्यास त्यांच्या मार्गे जाणे सोपे असायचे, परिणामी त्यांचे इतर आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत थेट राजकीय हीतसंबंध जोडले गेले. त्याचाच त्यांना सध्याच्या राजकीय बंडात फायदा झाला. मात्र शिंदेनी प्रचारात भाषणासाठी यावं आणि सभा दणाणून सोडावी अशी त्यांची शैलीच नाही. त्यामुळे शिवसेनेत राजकीय सभांचे आखाडे गाजविणाऱ्या शिवसेना नेत्यांमध्ये ते शिंदे कधीच नव्हते. आणि लोकं ओढून ताणून भाषणं कधीच ऐकत नाहीत. सध्या शिवसेना फोडणारा नेता अशी त्यांच्याबद्दल चर्चा रंगल्याने माध्यमांच्या पोलमध्ये ७-८ टक्के तरी मिळत आहेत, अन्यथा ते ही मिळाले नसते हे वास्तव आहे. मात्र बंड केल्यापासून ते समर्थकांच्या सभांमध्ये भाषणात मध्येच जोरात ओरडून तो आव आणण्याचा प्रयत्न करतात, पण ते त्यांना जमत नसल्याचं स्पष्ट दिसतंय.
अर्थकारणातून गर्दी खेचण्याचे हेतू वेगळे :
सध्या त्यांच्याकडे मुखयमंत्री पद आहे आणि त्या पदामुळे अनेकजण त्यांच्याकडे आकर्षित होतं आहेत. मुख्यमंत्री पद आल्याने अर्थकारण सोपं झालंय आणि त्यातून गर्दी दाखवणं आजच्या राजकरणात अवघड गोष्ट राहिलेली नाही. मात्र सध्या गर्दीची रंगलेली चर्चा आणि त्याचे अनेक राजकीय हेतू आहेत. वृत्त वाहिन्या ते वर्तमानपत्रात गर्दीचे मथळे छापून यावेत आणि उद्धव ठाकरेच्या शिवसैनिकांवर दबावाचे मानसिक आघात करणे, लोकं माझ्यासोबत आहेत हे माध्यमांच्या मार्फत दाखवणे हा खरा हेतू आहे. मात्र राजकीय दृष्ट्या सभांना गर्दी होणं हा निकष लोकं नेत्यासोबत आहेत हे ठरवत नाही. ते मतदानातूनच ठरतं. सभांना होणारी गर्दी हे लोकं आपल्यासोबत असल्याचा निकष असता, तर शिवसेनेतून फुटलेल्या नारायण राणे आणि राज ठाकरे यांना आठवावं आणि काय तो बोध घ्यावा.
काहीतरी धक्कादायक घडणार अशा राजकीय पुड्यांमागील हेतू काय?
शिंदे समर्थक आमदार आणि मंत्री सध्या बीकेसीतील मेळाव्यावरून आधीच अनेक राजकीय पुड्या सोडत आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांनाही माहिती आहे आणि ते म्हणजे माध्यमांचा मुख्य फोकस हा शिवाजीपार्कवर असणार आहे. त्यामुळे माध्यमांचे कॅमेरे आपल्यावर सुद्धा खिळून राहावे म्हणून शिंदे समर्थकांचा ठरवून चाललेला हा राजकीय खटाटोप आहे. त्यात शिंदेंचं भाषण ऐकायला महाराष्ट्रातील लोकांमध्ये आतुरता असते, असं म्हटलं तर तो राजकीय विनोद समजावा लागेल. कारण शिंदेंच्या भाषण शैलीचा सामान्य लोकांवर कोणताही प्रभाव नाही हे वास्तव आहे. त्यात शिंदेंचं भाषण शेवटी होणार म्हणजे शेवटपर्यंत आलेल्या लोकांना खिळवून ठेवायचं कसं हा देखील मोठा प्रश्न शिंदे गटाला असू शकतो. इकडे शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंपुर्वी नितीन बानगुडे, आमदार भास्कर जाधव असे नेते भाषणातून सभा गाजवतील. पण तिकडे बीकेसीत शिंदेंचं भाषण कोण ऐकतील का याची शाश्वती देता येणार नाही तिथे इतर नेत्यांची काय खात्री देणार अशी स्थिती आहे.
तर माध्यमांच्या LIVE दरम्यान अचानक TRP घसरेल :
या मेळाव्याची उत्सुकता असली तरी टीव्ही वाहिनीवर पाहणाऱ्यांची पहिली पसंती शिवसेनेच्या शिवाजीपार्क वरील मेळाव्याला असेल. त्यामुळे सभा सुरु असताना एखाद्या वृत्त वाहिनीने शिवाजीपार्क ऐवजी बीकेसीतील सभा दाखवल्यास लोकं चॅनल बदलून दुसऱ्या चॅनलवर जातील अशी शक्यता आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर या सभा मोबाईलवर पहिल्या जातील. त्यामुळे काही मिनिटासाठी जरी माध्यमांचे कॅमेरे बीकेसीत स्थिरावले तरी लोकं मोबाईलवर थेट शिवसेनेच्या अधिकृत फेसबुक किंवा युट्युब’वर सभा पाहतील. कारण बीकेसीत आरोप मालिकेशिवाय काहीच नसेल असं म्हटलं जातंय. तसेच शिवसेनेच्या विरोधकांचं आणि महाविकास आघाडीतील लोंकांचे लक्ष देखील शिवाजीपार्कवर असेल असा अंदाज आहे. कारण तिकडे अब्दुल सत्तार, भुमरे आणि इतर मोजके आमदार काय बोलणार ते माहिती असून, त्यांनी स्वतःच मागील काही दिवसात बोलायला सुद्धा शिल्लक ठेवलेलं नाही. कारण बीकेसीचं ध्येय केवळ गर्दी दाखवणं आहे दुसरं काहीच नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Shivsena Dasara Melava 2022 in focus check price details 03 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID