22 January 2025 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

एकनाथ शिंदे व मिलिंद नार्वेकरांनी राष्ट्रवादीच्या २ आमदारांना पकडून आणलं

NCP, Shivsena, Sharad Pawar, Eknath Shinde

मुंबई: राज्याच्या राजकारणातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला असेच म्हणता येईल कारण राज्यात महाविकासआघाडीची एकीकडे सत्तास्थापनेची तयारी सुरु असताना हा राजकीय भूकंप झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी आणि भाजपाचं नवं सरकार स्थापन स्थापन झाले आहे. राज्यपालांच्या उपस्थित देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यांच्या नंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ अजित पवारांनी देखील शपथ घेतली आहे. सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी हा शपथविधीचा सोहळा पार पडला.

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. गेले २९ दिवस महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला होता. महाविकास आघाडीचं सगळं ठरलं, अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार यावरही सहमती झाली आणि आज सकाळी महाराष्ट्राच्या या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहण्यास मिळाला. हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का होता. या सगळ्या घडामोडींच्या नंतर काही वेळातच शरद पवार यांनी ट्विट करुन हा राष्ट्रवादीचा व्यक्तीगत निर्णय आहे असं स्पष्ट केलं.

मंत्रालयासमोरच असलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे सर्व नेते, बहुतांश आमदार आणि शेकडो कार्यकर्ते जमले होते. कालपासून ‘नॉट रिचेबल’ असलेले धनंजय मुंडे तासाभरापूर्वीच या बैठकीला पोहोचले होते. त्यामुळे अजित पवारही परतणार का, याबद्दल प्रचंड उत्सुकता. परंतु उपस्थितांना आणखी एक धक्का बसतो.

कारण त्याच ठिकाणी कारमधून शिवसेना नेते एकनाथ शिंदे, एनसीपीचे शशिकांत शिंदे उतरतात. त्याच्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर एका व्यक्तीला खांद्याला धरून बाहेर काढतात. त्याला घट्ट पकडून, गर्दीतून वाट काढत हे सगळे नेते यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शिरतात. ही व्यक्ती कोण आणि तिला शिवसेना नेते असं धरून का घेऊन आलेत, हे सुरुवातीला कळत नाही. मात्र, ही व्यक्ती आमदार संजय बनसोडे असल्याचं काही मिनिटांत लक्षात येतं आणि टिपेला पोहोचलेला उत्साह निवळतो.

दरम्यान, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने फडणवीस सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. बहुमतासाठी आवश्यक किमान १४५ आमदारांचे पाठबळ असताना आणि आम्ही सरकार स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत असताना राज्यपालांनी भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करणे आणि शपथग्रहण सोहळा आयोजित करणे घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे, असे नमूद करतानाच या सरकारला तात्काळ विशेष विधिमंडळ अधिवेशन घेऊन बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती तिन्ही पक्षांनी याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाला केली आहे.

हॅशटॅग्स

#EknathShinde(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x