22 January 2025 7:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771
x

काय, तर जगाला हेवा वाटणार असा महाराष्ट्र घडविणार? कोणा बरोबर, तर चंद्रकांत पाटलांबरोबर - राजेश कदम

Raj Thackeray

मुंबई, ०६ ऑगस्ट | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी नंतर लगेचच माध्यमांवर युती संदर्भातील वृत्त झळकू लागली. मात्र हीच वृत्त राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांमध्ये जाताच त्यांनी सारवासारव आणि युतीच्या संदर्भात पूर्णविराम देणारं वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कृष्णकुंजवर पोहोचले आहेत. मात्र त्यापूर्वी या भेटीसंदर्भात बोलताना पाटील यांनी मनसे आणि भाजपाची युती होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. मात्र त्याचवेळी पाटील यांनी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट का घेतली यासंदर्भातही खुलासा केलाय.

मात्र याभेटीवरून आता माजी महाराष्ट्र सैनिक आणि विद्यमान शिवसैनिकांनी राज ठाकरेंच्या मागील वक्तव्यावरूनच टोला लगावला आहे. मनसेच्या कल्याण डोंबिवलीतील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. त्यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेतील माजी सभापती (परिवहन) राजेश कदम यांचा प्रमुख सहभाग होता. आता त्याच राजेश कदम यांनी ट्विट करत मनसे आणि भाजपाची खिल्ली उडवली आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलंय की, “काय, तर जगाला हेवा वाटणार असा महाराष्ट्र घडविणार? कोणा बरोबर, तर चंद्रकांत पाटलांबरोबर”.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena leader Rajesh Kadam criticized over Raj Thackeray and Chandrakant Patil meet news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x