16 April 2025 1:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा
x

उत्तर भारतीय शिवसैनिकाकडून मराठी शिवसैनिकाला गलिच्छ भाषेत शिवीगाळ, शिवसैनिक शांत

मुंबई, २३ जुलै : नितीन नांदगावकर हे विधानसभा निवडणुकीआधी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत दाखल झाले होते. विशेष म्हणजे रात्री १-२ च्या सुमारास त्यांना स्वतः उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश देण्यात आला होता. त्या प्रवेशाच्या वेळी स्वतः एकनाथ शिंदे आणि युवासेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई देखील रात्री मातोश्री बंगल्यावर उपस्थित होते. त्या पक्षप्रवेशा मागील शिवसेनेचा मुख्य हेतू हा मनसेच्या कार्यकर्त्यांना भावनिक धक्का देणं होताच, पण त्यासोबत पक्षात कामं करणाऱ्यांना निवडणुकीत तिकीट नाकारली जातात असा समज मनसेत पसरवणे हे देखील मुख्य कारण होतं. या प्रयोगात आणि नाटकाची कथा रचण्यात नितीन नांदगावकर देखील शिवसेनेसोबत तितकेच सामील होते.

नितीन नांदगावकर यांच्या मातोश्रीवरील पक्ष प्रवेशावेळी हसणारे चेहरे म्हणजे मंत्री एकनाथ शिंदे आणि वरून सरदेसाई सध्या घडलेल्या घटनेवरून तोंड बंद ठेवून असल्याचं दिसतं आहे. एकूण शिवसेना आणि नितीन नांदगावकर स्वतःच्या कर्मात अडकल्याची चर्चा आहे. राजकीय नियतीने त्यांना तोंडं बंद ठेवण्यापलीकडे दुसरा पर्याय शिल्लक ठेवल्याचं दिसत नाही असंच म्हणावं लागेल.

शिवसैनिक नितीन नांदगावकर यांच्या ‘नांदगावकर पॅटर्न’चं गुपितच समोर आल्याचं दिसतं आहे. कारण त्यांच्या तबदब्यामागे राज ठाकरेंचा पदाधिकारी हेच मूळ कारण होतं हे आज स्वतः नितीन नांदगावकर यांना शिवसेनेत आल्यावर उमगलं असणार असंच काहीसं घडलं आहे. झालं असं की शिवसेनेचे कार्यकर्ते तुलसी सिंह राजपूत यांनी नितीन नांदगावकर यांना फोन करून अत्यंत घाणेरड्या आणि गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत घरात घुसून मारण्याची धमकी दिली. शिवसैनिक तुलसी सिंह राजपूत हे मूळचे उत्तर भारतीय कार्यकर्ते असून मी राजपूत असल्याचा कांगावा करत अप्रत्यक्षरित्या मराठीलाच आवाहन दिल्याचं संभाषणातून कळत.

तुलसी सिंह राजपूत यांनी संभाषणात थेट शिवसेना भवनाचा उल्लेख करत, “जा तिकडे आणि विचार मी कोण आहे” असं सांगत नितीन नांदगावकर यांना थेट धमकावलं आहे. या भांडणांमागे हिरानंदानी रूग्णालयातील सुरक्षारक्षकांशी झालेल्या बाचाबाचीचा त्यांनी नांदगावकर यांना जाब विचारला आणि शब्दाला शब्द वाढत गेल्याचं ऑडिओक्लिपमध्ये ऐकू येतं आहे. तुलसी सिंह राजपूत यांच्या एकूण संभाषणात त्यांना शिवसैनिक असण्यापेक्षा उत्तर भारतीय असण्याची अधिक गरमी असल्याचं निदर्शनास आलं आहे. मात्र एका उत्तर भारतीय शिवसैनिकाने दुसऱ्या मराठी शिवसैनिकाची याप्रकारे गलिच्छ भाषेत हेटाळणी केली असली तरी मराठीच्या न्याय हक्कावरून बोंबा मारणारे शिवसैनिक सध्या शांत असून, आम्हाला काहीच ऐकू आलंच नाही अशा भूमिकेत दिसत आहेत. याप्रकरणावरून शिवसेना उत्तर भारतीयांच्या सन्मानाचे मेळावे का भरवते याचा प्रत्यय मराठी माणसाला आला असला तरी मूळचा सामान्य शिवसैनिक देखील वरिष्ठ नेत्यांप्रमाणे स्वार्थी राजकारणी झाल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.

 

News English Summary: Nandgaonkar had argued with the hospital administration to get the body of the autorickshaw driver in custody and to reduce the bill paid to the family by the Hiranandani hospital administration. This time he had an argument with the security guards. After all this, a person has called Nandgaonkar and threatened to kill him directly.

News English Title: Shivsena leader Tulsi Singh Rajput used many bad words against shivsena leader Nitin Nandgaonkar News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NitinNandgaonkar(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या