23 February 2025 10:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

हे असले बिनडोक फडणवीस यांचे सल्लागार होते; वरुण सरदेसाईंचा श्वेता शालिनी यांना टोला

Shweta Shalini, Shivsena, Yuva Leader Varun Sardesai

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्लागार म्हणून परिचित असलेल्या श्वेता शालिनी यांच्यावर शिवसेना युवा नेते वरुण सरदेसाई यांनी जेएनयू’संबंधित ट्विट वरून खोचक टीका करत, फडणवीस यांना देखील अप्रत्यक्ष लक्ष केलं आहे. JNU’मध्ये काल रात्री झालेल्या हल्ल्यावरून देशभर आंदोलन आणि घटनेवर टीका होतं असताना श्वेता शालिनी यांनी भलतंच ट्विट केली आहे.

त्या ट्विट मध्ये श्वेता शालिनी यांनी म्हटलं आहे की, ‘Let’s shut down JNU. ना रहेगा बाँस ना बजेगी बाँसुरी’ असं असंवेदनशील ट्विट केल्याने नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे आणि त्यालाच अनुसरून वरुण सरदेसाई यांनी श्वेता शालिनी यांना सणसणीत टोला लगावला आहे.

वरुण सरदेसाई यांनी ट्विटला प्रतिउत्तर देताना म्हटलं आहे, ‘हे असले बिंडोक मा. मुख्यमंत्री फडणवीसजी यांचे ‘advisor’ होते?!?!…….असला ‘advise’ ऐकला तर सगळ्या University बंद करून, तरुणांना चहा – पकोडे चे स्टॉल उघडून द्यावे लागतील’.

दरम्यान, जेएनयूमधील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुण्यातील गरवारे कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आधुनिक हिटलर असल्याचे पोस्टर्सही आंदोलकांनी हाती घेतले होते. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख ‘तडीपार’ असा केलेले फोटो हाती पकडले होते. सुरक्षित शिक्षण हा आमचा अधिकार असल्याचे पोस्टर्स विद्यार्थ्यांनी दाखवले. या आंदोलनात विद्यार्थ्यांबरोबरच विद्यार्थिनीही सहभागी झाल्या होत्या हे विशेष.

तत्पूर्वी जेएनयूत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण आहे. रात्रभर कॅम्पस, एम्स तसेच दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. एम्समध्ये दाखल करण्यात आलेल्या जखमी विद्यार्थ्यांना भेटू दिले जात नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी एम्समध्येच धरणे आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान, जेएनयू कॅम्पसमध्ये पोलिसांनी रात्री फ्लॅग मार्च केला.

मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढत या हल्ल्याचा निषेध केला तर पुण्यातही एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला आहे. जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे प्रतिसाद पुण्यातील शिक्षण संस्थांमध्ये उमटले असून, एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांनी रात्री उशिरा संस्थेसमोर एकत्र येत हल्ल्याचा निषेध केला. तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात घोषणाबाजी करत जेएनयूमधील विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

 

Web Title:  Shivsena Leader varun Sardesai Slams Shweta Shalini over JNU Twit.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x