22 January 2025 1:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

मनसेला पोटशूळ, आम्ही शिवाजी पार्कात विद्यूत रोषणाई करतोय | मनसे केवळ दिवाळीत रोषणाई करते - विशाखा राऊत

Shivsena

मुंबई, १३ ऑगस्ट | शिवसेनेचे खासदार सदा सरवणकर यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात मोठं विधान केलं आहे. दादर, माहीम परिसरात कार्यालय उघडणाऱ्या भाजप आणि भाजप नेते नितेश राणे यांच्यावर शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर कडाडले आहेत. त्यांना कितीही दुकाने उघडू द्या. त्यांना दादर, माहीमच काय कोकणातही जिंकू देणार नाही, असा दावाच आमदार सदा सरवणकर यांनी केला आहे.

दादर-माहीम मतदारसंघाचे शिवसेना आमदार सदा सरवणकर आणि मुंबई महानगरपालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्या हस्ते माहीम इथे शिव भोजन केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी हा इशारा देण्यात आला. भारतीय जनता पक्षाला दादर, माहीममध्ये प्रवेश मिळणार नाही. भाजप आणि नितेश राणे यांनी अशी अनेक दुकाने उघडली आहे. त्यांनी कितीही दुकाने उघडू द्या. नितेश राणेंना आम्ही त्यांच्या कोकणातल्या मतदार संघात ही जिंकू देणार नाही, असा इशारा सरवणकर यांनी दिला आहे.

मनसेला नेहमीच पोटशूळ:
यावेळी मुंबई महापालिकेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. मनसेचा प्रत्येक गोष्टीत विरोध असतो. मनसेला पोटशूळ येतं. आम्ही शिवाजी पार्कात विद्यूत रोषणाई करत आहोत. मनसे केवळ दिवाळीत रोषणाई करते, असं सांगतानाच शिवसेनेच्या पहिल्यापासून शिवाजी पार्कमध्ये सभा झाल्या मग इतरांनी सभा घेऊ नये असे आम्ही म्हणतो का? शिवाजी पार्कवर सर्वांचाच अधिकार आहे, असं राऊत म्हणाल्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena leader Vishakha Raut criticized MNS party news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x