22 December 2024 7:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

आम्ही बाळासाहेबांच्या रणरागिणी आहोत, हिंमत असेल तर समोर यायचं, फाडून काढणार एकेकाला

Shivsena Mahila Aghadi

मुंबई, १६ जून | उत्तर प्रदेशाच्या अयोध्येतील राम मंदिर भूखंड खरेदीत झालेल्या घोटाळ्यावरून शिवसेनेने टीका केली होती. त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने आज दादरच्या शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला. मात्र, शिवसेना भवनासमोर शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमल्याने पोलिसांनी या आंदोलकांना सेना भवनापासून पाच किलोमीटर अंतरावरच अडवलं. तसेच या मोर्चकऱ्यांची धरपकड करण्यात आली. परंतु, दोन्ही पक्षांमधील संघर्ष टळला असं वाटत असतानाच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना कार्यकर्ते अचानक भिडल्याने सेना भवन परिसरात तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून शिवसैनिकांचीही धरपकड केली.

भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे तेजिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली या फटकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राम मंदिर भूखंड घोटाळ्यावरून शिवसेनेने केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून युवा मोर्चाने आंदोलन पुकारले होते. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचा मोर्चा शिवसेना भवनावर येणार असल्याची कुणकुण लागताच शिवसेनेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक शिवसेना भवना समोर जमले, विशेष म्हणजे त्यात महिलांचा मोठा प्रमाणावर समावेश होता

दरम्यान, पोलिसांची व्हॅन या आंदोलकांना घेऊन शिवाजी पार्ककडे निघाली. तेव्हा व्हॅन येताच काही शिवसैनिक व्हॅनच्या दिशेने धावले. आंदोलकांना पकडण्यासाठी शिवसैनिक धावले होते. परंतु, व्हॅन सुसाट गेल्याने भाजप कार्यकर्ते शिवसैनिकांच्या हाती लागले नाहीत. मोर्चा संपला असं वाटत असतानाच अचानक शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. शिवसैनिकांनी भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना चोप दिला. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी काही शिवसैनिकांची धरपकडही सुरू केली. आम्ही गाडी करून चाललो असताना शिवसैनिकांनी आम्हाला मारलं असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

शिवसेना भवनासमोर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये महिलांचा देखील मोठा सहभाग होता. शिवसेनेच्या या महिला आघाडीचं नेतृत्व मुंबई महापालिकेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी केलं. या गदारोळानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपला प्रचंड रोष व्यक्त केला

उपस्थित महिला कार्यकर्त्या म्हणाल्या, “सुरुवात आम्ही केली नाही. सुरुवात त्यांनी केली. आम्ही शांतपणे सेना भवनजवळ असलेल्या पेट्रोलपंपावर उभे होतो. जेव्हा आम्हाला कळलं, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सेनाभवनावर हल्ला करणार तेव्हा आम्ही पेट्रोलपंपाजवळ उभे होतो. नंतर आम्हाला कळंल ते तिथून सेना भवनात येत आहेत, म्हणून आम्ही शांतपणे इथे घोषणा देत होतो. आमचे कार्यकर्ते उपस्थित होते. सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या सुरुवातीमुळे हा सगळा प्रकार झाला. आम्ही आंदोलनाला नाही म्हटलंच नाही. त्यांनी आंदोलन केलं. आम्ही सेना भवनाचं रक्षण केलं. आम्ही त्यांच्यावर हल्ला केला नाही”, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या महिला आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या श्रद्धा जाधव यांनी प्रतिक्रिया दिली.

भारतीय जनता पक्षाला यापुढेही असंच उत्तर देणार का? असं प्रश्न विचारला असता “या बाळासाहेबांच्या रणरागिणी आहेत. त्यांच्यात हिंमत होती तर समोर यायचं होतं. फाडून काढलं असतं एकेकाला”, अशी प्रतिक्रिया एका महिलेने दिली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Shivsena Mahila Aghadi gone aggressive against BJP Yuva Morcha at Shivsena Bhawan news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x