राज ठाकरेंना बहुतेक मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची अडचण वाटत असावी | सेनेनं डिवचलं
मुंबई, ३० ऑक्टोबर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली होती. राज्यातील वाढीव वीज बिल प्रश्नाविषयी राज ठाकरेंनी भेट घेतली होती. त्यावेळी राज्यपालांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सल्ला घेण्यास राज ठाकरे यांना सांगितले होते.
त्यानंतर राज ठाकरे म्हणाले कि, वाढीव वीज बिलाप्रश्नी राज्यपालांशी चर्चा करण्यात आली. गेली अनेक दिवस माझा पक्ष, कार्यकर्ते प्रकरणी आंदोलन करत आहेत. परंतु, याप्रकरणी कंपन्या एमईआरसीकडे बोट दाखवत आहेत, दुसरीकडे एमईआरसी आमचे काही दडपण नाही म्हणत आहे.
तसेच, नितीन राऊत यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊ सांगितले, पण अजून तो होत नाही. याविषयी शरद पवारांशी बोलण्याचा सल्ला राज्यपालांकडून देण्यात आला आहे. याप्रकरणी नागरिकांना लवकरात लवकर दिलासा देण्यात यावा. या मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी बोलणार असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले होते.
अखेर राज यांनी राज्यपालांचा सल्ला मान्य करत शरद पवारांशी फोनवर चर्चा केली आहे. दूध उत्पादक शेतकरी आणि वाढीव वीज बिलाच्या मुद्यांवर आज राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी राज यांनी सर्वसामन्याच्या वीज बिलात झालेली वाढ कमी करण्यात यावी आणि इतर महत्वाच्या विषयांबद्दल चर्चा केली.
दरम्यान, राज्यपालांच्या या भूमिकेवरुन शिवसेनेनं राज ठाकरे यांनी डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी राज ठाकरे आणि राज्यपालांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांना बहुतेक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची अडचण वाटत असावी. त्यामुळे राज्यपाल यांनी त्यांना शरद पवारांना भेटण्यासाठी सांगितले. तसेच शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है, असं मिश्कील प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
News English Summary: Shiv Sena has tried to oust Raj Thackeray from this role of Governor. Minister of State and Shiv Sena leader Abdul Sattar has reacted to the meeting between Raj Thackeray and the Governor. Raj Thackeray must have found it difficult to approach most of the Chief Minister Uddhav Thackeray. So the governor asked him to meet Sharad Pawar. Also, Sharad Pawar has a cure for every ailment, said Abdul Sattar.
News English Title: Shivsena minster Abdul Sattar reply over meeting between MNS chief Raj Thackeray and the governor News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News