23 December 2024 12:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

ShivSena, Mira Bhaindar, Corporator, Coronavirus

मीरा-भाईंदर, ९ जून: मीरा-भाईंदर येथे कोरोना विषाणूची लागण झालेले शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हरिश्चंद आंमगावर यांना आठवड्यापूर्वी कोरोना विषाणूची बाधा झाली होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

५५ वर्षीय नगरसेवकावर दोन आठवड्यांपासून ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन आठवड्यापूर्वी त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्याच्या निधनामुळे मिरा भाईंदर शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरसेवकाची पत्नी आणि आईलाही कोरोनाची लागण झाली असून त्यांवर उपचार सुरु आहेत.

आठवड्यापूर्वी आंमगावकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांना ठाणे येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांवर उपचार सुरु होते. दरम्यान त्यांच्या पत्नीला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला होता. तरर भाऊ आणि आई हे अद्यापही वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

News English Summary: Shiv Sena corporator and group leader of Mira Bhayander Municipal Corporation died due to corona virus. He died Tuesday morning while undergoing treatment at a private hospital.

News English Title: ShivSena Mira Bhaindar Corporator Coronavirus News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x