27 January 2025 5:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA NTPC Share Price | पीएसयू एनटीपीसी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPC Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS Railway Ticket Booking | 'पैसे न भरता' रेल्वे तिकीट बुक करा आणि बिनधास्त प्रवास करा, ही सुविधा 90% प्रवाशांना माहित नाही Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 42 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON IREDA Share Price | इरेडा शेअर मालामाल करणार, आयसीआयसीआय ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

Andheri East By Poll | ऋतुजा लटके यांना फोडण्यासाठी शिंदे गटाकडून मंत्रिपदाचं अमिष आणि राजकीय दबाव - अनिल परब

Shivsena

Andheri East By Poll Assembly Election | दिवंगत आमदार रमेश लटके हे कट्टर शिवसैनिक होते. त्यांनी अनेक शाखांमध्ये काम केलं. शिवसेनेला मोठं योगदान दिलं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात तिकीट देण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र एक महिन्यानंतर त्यांना त्यांचा राजीमाना चुकीच्या पद्धतीने दिल्याचं सांगितल्याचं कारण देतं त्यांचा राजीनामा नाकारला गेला. त्यामुळे त्यांनी त्यांनी नव्याने राजीनामा दिला.

पत्रकार परिषदेत आमदार अनिल परब याबद्दल बोलताना म्हणाले, की ऋतुजा परब यांनी एक महिन्यापूर्वी राजीनामा दिला होता. मात्र, 3 ऑक्टोबरला 1 महिन्याने राजीनामा चुकीचा असल्याची माहिती बीएमसीने दिली. या प्रकरणात राजीनामा मंजूर न झाल्यास कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आज दुपारी कोर्टात सुनावणी होणार असल्याचंही ते म्हणाले. ते म्हणाले, की शिंदे गट दबाव टाकत असल्याच्या बातम्या ऐकल्या. मात्र रमेश लटके यांचं कुटुंब अशा दबावाला कधीही बळी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. करणार नाही.

आमदार अनिल परब म्हणाले, की ऋतुजा लटके माझ्या संपर्कात आहेत. योग्य वेळी आल्यावर त्या माध्यमांसमोर आपली भूमिका मांडतील. ऋतुजा लटकेंना घाबरण्याचं कारण नाही. जाणुनबुजून त्यांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर काढण्यासाठी किंवा आपल्या गटात खेचण्यासाठी हे केलं जातं आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. मात्र, लटके कुटुंब शिवसेनेशी एकनिष्ठ आहे, असंही ते म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena MLA Anil Parab press conference over Andheri East candidate Krutuja Latke nomination check details 12 October 2022.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x